Saturday, November 2, 2024
Homeशब्दगंधअरूंद रस्ते व आमचा टेम्पो

अरूंद रस्ते व आमचा टेम्पो

हिमाचलमध्ये रस्ते अतिशय अरूंद. पण जे रस्ते बांधलेले आहेत त्यांना तोड नाही. एका पातळीवर जाणारा सरळसोट रस्ता नाही. हिमाचलचा मुख्य महामार्ग छक-5 मात्र लोण्यासारखा गुळगुळीत व आरामदायक. त्यापासून विविध डोंगरांना जोडणारे रस्ते विविध छोटी खेडी व प्रेक्षणीय स्थळे यांना जोडत पुढे पुढे सरकत जातात. येथे वहानचालकांमध्ये कमालीची शिस्त पाहिली, हे अगदी आवर्जून सांगावेसे वाटते. समोरासमोर आलेल्या वहानांमध्ये कोणी पुढे व कोणी बाजूला वाहन घ्यावे हे न ओरडता येथील चालकांना बरोबर समजते. जणू ते मनकवडेच! आमचा मोठा टेम्पो ट्रॅव्हलर अनेक ठिकाणी फसला. सुरुवातीला शिमला हॉटेलमध्ये चढवताना जमिनीशी जवळपास 50ओ कोन केलेल्या रस्त्यावर तो ट्रक पुढे-मागे, डावा-उजवा वळवून रिव्हर्स गियरमध्ये हॉटेलच्या प्रवेशद्वारापाशी निमुळत्या रस्त्याने वर आणणे हे शियर ड्रायव्हिंग स्किल.

कामरू मॉनेस्ट्री बघायला गेलो तेव्हा आत आत जाताना रस्त्याचा भाग एवढा अरूंद झाला की तो अख्खा टेम्पो परत वळवायला जागाच राहिली नाही. आम्ही पुढे पुढे जात राहिलो व मागे टुरिस्ट वाहनांची भली मोठी रांग! करायचे काय? शेवटी पुढे एका नाल्याजवळ बाजूला उभे राहिलो. मागील वहानांना पुढे जाऊ दिले मग श्वास रोखा आता…एकच रस्ता, ज्याची एक बाजू सरळ कोनाशी 50ओचा लघुकोन करेल व त्यालाच जोडलेला परंतु थेट मागे जणू खाईत गेल्यागत दुसरा रस्ता हा त्याच सरळ कोनाशी 180+30ओचा प्रविशाल कोन ( ुळींह ीीींरळसहीं वेुप लशपीं) करेल असा. चालकाच्या भाषेत हेयरपीन यू टर्न. आमचा टेम्पो तिथल्या भुसभुशीत वाळूत घसरू लागला. त्या चालकाने तो टेम्पो मागे-पुढे करून शेवटी वर नेणार्‍या रस्त्याशी रिव्हर्स करत कसाबसा सरळ कोनात आणला. (आपल्यापैकी जे चालक असतील, त्यांना या प्रसंगाचे गांभीर्य समजेल) सारे गाव जमा झाले मदतीला. (हिमाचलमध्ये खेडी अगदी छोटी). चालकाला र्सीळवश करणारी आमच्या ींशरा मधील पुरुष मंडळी खाली उतरली होती. जेव्हा टेम्पोला शिीषशलीं रपसश्रश मिळाला, वीर्ळींशी ने तो सुसाट वेगाने पुढे नेला (कानात वारं भरल्यागत) कारण त्या अवधीत एखादे वाहन पुढे आले असते तर कोणाचीच खैर नव्हती. आमची रात्र कामरूच्या पायथ्याशी, कामरू न पाहताच गेली असती. जवळपास अर्धा कि.मी. पुढे गेलो तेव्हा पुरुष मंडळी धावत आली व धडाधड आत शिरली… क्रमशः

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या