Wednesday, September 30, 2026
Homeक्राईमCrime News : दरोड्याच्या तयारीत तिघे जेरबंद; दोघे पसार

Crime News : दरोड्याच्या तयारीत तिघे जेरबंद; दोघे पसार

बोल्हेगाव फाट्याजवळ एमआयडीसी पोलिसांची कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील बोल्हेगाव फाट्याजवळील आराध्या पेट्रोलपंपाच्या पाठीमागे, हॉटेल बजरंगच्या बाजूला दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून गावठी कट्टा, जिवंत काडतूस, मिरची पावडर, तीन मोबाईल फोन आणि दोन दुचाकी असा सुमारे 1 लाख 81 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, पोलिसांना पाहताच दोघांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला.

- Advertisement -

एमआयडीसी पोलिसांचे एक पथक सोमवारी (28 सप्टेंबर) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हद्दीत खासगी वाहनाने गस्त करीत होते. त्यावेळी त्यांना पाच जण दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना दिली. त्यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेत कारवाईची तयारी केली. पथकाने सदर ठिकाणी छापा टाकताच पाचही जण पळू लागले.

पोलिसांनी पाठलाग करून प्रेम नरेंद्र भाकरे (23, रा. नागापूर), यश सुनील घाग (23, रा. पितळे कॉलनी, नागापूर) आणि विशाल भाऊसाहेब पाटोळे (24, रा. नागापूर) यांना पकडले. अभिषेक ऊर्फ भोर्‍या अरविंद भिंगारदिवे व संग्राम सोन्याबापू कदम (दोघे रा. नागापूर) हे अंधाराचा फायदा घेत पसार झाले. ताब्यात घेतलेल्या तिघांची अंगझडती घेतली असता एक गावठी कट्टा, जिवंत काडतूस, मिरची पावडर, तीन मोबाईल व दोन दुचाकी मिळून आल्याने सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी शिंदे गटही उतरविणार उमेदवार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) पदाधिकार्‍यांना विश्वासात घेतले जात नसल्याची भावना व्यक्त करत, निवडणुकीत...