Friday, April 25, 2025
Homeक्राईमदरोड्याच्या तयारीत असलेली 10 जणांची टोळी गजाआड

दरोड्याच्या तयारीत असलेली 10 जणांची टोळी गजाआड

3.58 लाखांचा मुद्देमाल जप्त || एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर-मनमाड महामार्गावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या 10 जणांच्या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सोमवारी (17 मार्च) रात्री 10:30 वाजता करण्यात आली. पोलिसांनी तीन लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना माहिती मिळाली की, विळद घाटाजवळ चौधरी हॉटेलसमोरील रस्त्यालगत 9 ते 10 इसम हत्यारांसह दरोड्याच्या तयारीत दबा धरून बसले आहेत. मिळालेल्या माहितीनंतर पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले.

- Advertisement -

रात्री 11:30 च्या सुमारास पोलिसांनी टाकलेल्या सापळ्यात 10 जण अडकले. यामध्ये मयूर पोपट बोरूडे (वय 24, रा. शेवाळे मळा, अहिल्यानगर), संकेत विजय बारस्कर (वय 24), ऋतिक रमेश शिंदे (वय 24), संतोष राम घोडके (वय 24, तिघे रा. सिध्दार्थनगर, अहिल्यानगर), अनिल वसंत घोरपडे (वय 26, रा. भुतकरवाडी, अहिल्यानगर), अनिकेत अनिल गायकवाड, ऋषिकेश राजू पाटोळे (वय 25), शिवम अनिल झेंडे (वय 24, सर्व रा. सिध्दार्थनगर, अहिल्यानगर), अजय राजेश गायकवाड (22, रा. भुतकरवाडी, अहिल्यानगर), रोहित बाळू अटक (वय 24 रा. सिध्दार्थनगर, अहिल्यानगर) यांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून लोखंडी कोयते, लोखंडी पाईप, कुर्‍हाड, दोरी, मिरची पूड, लाकडी दांडके, चार दुचाकी, नऊ मोबाईल असा तीन लाख 58 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मयूर बोरूडे आणि अनिल घोरपडे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर तोफखाना, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी सहायक निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज मोंढे, देविदास भालेराव, अंमलदार राजू सुद्रिक, मिसाळ, सचिन आडबल, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, प्रशांत धुमाळ, गिरवले यांच्या पथकाने केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...