Monday, September 28, 2026
Homeक्राईमCrime News : तरूणाला लुटणारी सहा जणांची टोळी गजाआड

Crime News : तरूणाला लुटणारी सहा जणांची टोळी गजाआड

दोन तरूणींचा सहभाग || 2.88 लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तालुक्यातील बारदरी शिवारातील गर्भगिरी फाटा येथे मध्यरात्री घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहा जणांना अटक करून दोन लाख 88 हजार 100 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सुलभ अंबादास नरसाळे (वय 29, रा. नालेगाव, कल्याण रस्ता, अहिल्यानगर) हे 24 जानेवारी रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बारदरी रस्त्यावरील गर्भगिरी फाटा येथे लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला वाहन थांबवून उभे असताना दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्याला कोयता लावून जबरदस्तीने सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम हिसकावून पळ काढला होता.

- Advertisement -

या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये व त्यांच्या पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.

तपासादरम्यान 30 जानेवारी रोजी गुन्हा करणारे संशयित आरोपी तपोवन रस्ता परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून शुभम शहादेव बडे (वय 26, रा. वाणीनगर, पाईपलाईन रस्ता, सावेडी), सोहेल पापाभाई सय्यद (वय 29, रा. देवटाकळी, ता. शेवगाव) आणि अशपाक नासिर पठाण (वय 28, रा. यशवंतनगर, भिंगार) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी दोन तरूणींच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर वैष्णवी राजेंद्र उनवने (वय 24, रा. भगवान बाबा चौक, निर्मलनगर, सावेडी) व रूपाली गजानन बनकर (वय 24, रा. एमआयडीसी) या दोन्ही तरूणींना अटक करण्यात आली.

चोरीतील सोन्याचे दागिने सोनारामार्फत विक्री केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सोनार सुरज प्रदीप शहाणे (वय 34, रा. शास्त्रीनगर, केडगाव) यालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. संशयित आरोपींकडून 11 ग्रॅम वजनाची सोन्याची गोळी, चार मोबाईल, एक दुचाकी व लोखंडी कोयता असा एकूण दोन लाख 88 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुभम बडे व अशपाक पठाण यांच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...