Monday, June 17, 2024
Homeक्राईमनगरजवळ दरोड्याच्या तयारीत असणारे चौघे जेरबंद

नगरजवळ दरोड्याच्या तयारीत असणारे चौघे जेरबंद

आरोपीमध्ये तीन सराईत गुन्हेगार || अंधाराचा फायदा घेत दोघे फरार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नगरच्या लिंक रोड परिसरामध्ये दरोड्याचे तयारीत असलेल्या चौघा रेकॉर्डवरील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. पकडलेल्या आरोपीमध्ये तिघे सराईत गुन्हेगार असून यातील एका आरोपी विरोधात नगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात 17 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर यावेळी अंधाराचा फायदा घेत दोघे फरार झाले आहेत. याबाबत हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सुचनेनूसार स्थानिक गुन्हे शाखा जिल्ह्यात चोरीचे गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असतांना ओसवाल इंपिरियल चव्हाण (रा. वाळुंज पारगांव, नगर) हा त्याच्या साथीदारांसह दोन मोटारसायकलवर येवून कल्याण रोड ते केडगाव लिंक रोडजवळ गायके मळा रोडला असलेल्या ओढ्यालगत अंधारामध्ये थांबुन दरोडा टाकण्याच्या तयारी असल्याची माहिती मिळाली.

त्यानूसार पोलीस निरिक्षक दिनेश आहेर यांनी पथक पाठवून कल्याण रोड ते केडगाव लिंक रोड गायक मळा याठिकाणी जावून खात्री केली असता काही संशयीत इसम दबा धरुन बसलेले दिसले. पोलीस पथकाची चाहुल लागताच ते पळुन जावु लागले. पथकाने त्यांचा पाठलाग करुन शिताफीने 4 इसमांना ताब्यात घेतले. यावेळी दोघे अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. ताब्यात घेतलेल्यामध्ये ओसवाल इंपिरियअल चव्हाण (वय 28 वर्षे, रा. वाळुंज पारगाव, नगर), डेग विठ्ठल भोसले (वय 29 वर्षे, रा. आनंद चिखली, ता. आष्टी), तुषार उर्फ नुटल्या इंपिरिअल भोसले (वय 33 वर्षे, रा. वाळुंज पारगाव, नगर), नागेश रेजा काळे (वय 25 वर्षे, रा. वाळुंज पारगाव, ता. जि. नगर) असे असल्याचे सांगितले. तर पळुन गेलेल्यांमध्ये अजय विलास चव्हाण (रा. हातवळण, ता. आष्टी), कान्ह्या उर्फ कानिफ उध्दव काळे असे असून हे दोघे फरार आहेत. यावेळी संशयीतांची पंचा समक्ष अंगझडती घेता त्यांच्याकडे 1 तलवार, 1 सुरा, 1 लोखंडी कटावणी, मिरचीपुड, दोन महागडे मोबाईल, दोन मोटारसायकल 2 लाख 12 हजार 900 रुपये किमंतीचा मुद्देमाल मिळून आला आहे.

यातील आरोपी ओसवाल इंपिरिअल चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुध्द खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी, चोरी असे गंभीर स्वरुपाचे 17 गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे नगर तालुका, कोतवाली, अकोले, एमआयडीसी, भिंगार कॅम्प, पारनेर, घारगाव आदी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तसेच आरोपी तुषार ऊर्फ नुटल्या इंपिरीयल चव्हाण हा देखील सराईत गुन्हेगार असून त्यांचे विरुध्द खुनाचा प्रयत्न, चोरी असे गंभीर स्वरुपाचे3 गुन्हे दाखल आहेत. आरोपी नागेश रेजा काळे हा सराईत गुन्हेगार असून त्यांचे विरुध्द खुन, दुखापत असे गंभीर स्वरुपाचे 2 गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या