Saturday, April 26, 2025
Homeनंदुरबारखांडबारा रस्त्यावर वाहन अडवून दरोडा

खांडबारा रस्त्यावर वाहन अडवून दरोडा

नंदुरबार | nandurbar| प्रतिनिधी

नंदुरबार-खांडबारा रस्त्यावर वाहनासमोर (vehicle) दुचाकी आडवी लावून सुमारे ७ लाख रुपये किंमतीचा किराणा माल जबरदस्तीने चोरुन (Robbery) नेल्याप्रकरणी आठ जणांविरूध्द उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार येथील शुभम पार्क सहारा टाऊन येथे राहणार्‍या सचिन भगवान पाटील हे त्यांच्या चारचाकी वाहनाने (क्र.एम.एच. ३९ एडी ११३३) किराणा माल घेवून गुली ओली फाट्याजवळून जात होते.

यावेळी शांताराम कांतीलाल वळवी, नितीन संजय वळवी यांनी चारचाकी वाहनासमोर दुचाकी आडवी लावून वाहन थांबविले. तसेच सचिन पाटील यांना वाहनातून खाली उतरवित वाहनामध्ये विमल गुटखा असल्याचे सांगून वाहन तपासण्याचे सांगून जिवेठार मारण्याची धमकी दिली.

यावेळी सचिन पाटील यांनी वाहनात विमल गुटखा नाही असे सांगितले असता दोघांनी सचिन पाटील यांना वेडापावला गावाजवळ घेऊन जात त्यांच्या खिशातील मोबाईल काढून घेत जिवेठार मारण्याची धमकी दिली.

तसेच सचिन पाटील यांना परत गुली ओली फाट्याजवळ सोडून त्यांचा मोबाईल परत केले. तसेच पप्पू, अंकुश देवानंद वळवी हसन विकास पाडवी, चंदुभैय्या (सोहेल कुरेशी), सचिन ठाकरे व नागो ठाकरे यांनी जबरदस्तीने सचिन पाटील यांचे ७ लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन व २० हजार रुपये साखर कट्टे व परिवार तेलाचे डब्बे लूटून नेले.

याबाबत सचिन पाटील यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात भादंवि कलम ३४१, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील शांताराम वळवी, नितीन वळवी, अंकुश देवानंद वळवी व हसन विकास पाडवी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रविण कोळी करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...