Tuesday, April 29, 2025
Homeनाशिकप्रवाशांना धमकावत मारहाण व लुटमार

प्रवाशांना धमकावत मारहाण व लुटमार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सीबीएस व द्वारका परिसरात दुचाकीस्वार चोरट्यांनी प्रवाशांना धमकावत, मारहाण करीत त्यांच्याकडील मोबाइल हिसकावून नेल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. याप्रकरणी सरकारवाडा व भद्रकाली पोलिस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकाच रात्री व ठराविक वेळेत या घटना घडल्याने तिनही घटनांमध्ये चोरटे एकच असल्याचा संशय वर्तवला जात आहे.

- Advertisement -

सीबीएस येथील माझदा हॉटेलसमोर तिघांनी मिळून दोघा विद्यार्थ्यांना मारहाण करीत त्यांच्याकडील मोबाइल हिसकावून नेल्याची घटना घडली. रोशन जोगवेकर (२३, रा. पंडित कॉलनी) याच्या फिर्यादीनुसार, गावावरून आलेल्या मित्रास घेण्यासाठी तो सीबीएसला गेला. तेथून दुचाकीत पेट्रोल टाकण्यासाठी ‌त्र्यंबकनाका सिग्नलच्या दिशेने गेला. त्यावेळी चोरट्यांनी दोघांना अडवून धमकावले. रोशनकडील मोबाइल हिसकावून चोरट्यांनी रोशनचा मित्र सुरज पगार यास मारहाण करीत पसार झाले. त्याचवेळी ठक्कर बाजारकडून श्रीराज गोसावी (२३, रा. सावरकर नगर, गंगापूर रोड) हा तेथे आला. मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याचे श्रीराजने रोशनला सांगितले. रोशन व श्रीराज यांच्याकडील मोबाइल हिसकावणारे चोरटे एकच असल्याचे समोर आले. सरकारवाडा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्काबुक्की करुन मोबाईल हिसकावला
द्वारका परिसरात तिघांनी मिळून एकास धक्काबुक्की करून शिवीगाळ करीत १५ हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून नेल्याची घटना बुधवारी (दि.८) पहाटे घडली. याप्रकरणी विनोद शर्मा (५१, रा. मध्यप्रदेश) यांच्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अडवले. तिघांनी धक्काबुक्की, दमदाटी करीत शर्टच्या खिशातून मोबाइल हिसकावून नेला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राज्यातील नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांना आता खाकी गणवेश

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai राज्यातील नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी खाकी रंगाच्या गणवेशास मान्यता देण्यात आली आहे. या गणवेशात टोपी निळ्या रंगाची असून त्यावर सुरक्षा रक्षक मंडळाची...