Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमटेम्पोमधून येऊन रात्रीचे वेळी दुकाने फोडणार्‍या टोळीतील 4 आरोपी जेरबंद

टेम्पोमधून येऊन रात्रीचे वेळी दुकाने फोडणार्‍या टोळीतील 4 आरोपी जेरबंद

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील घोडेगाव परिसरात रात्रीच्या वेळी टेम्पो मधून येऊन दुकाने फोडणार्‍या टोळीतील चार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दि. 03 मार्च रोजी रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी अकिलकुमार जाराम अक्कापेल्ली (वय 28, रा.घोडेगाव) हे मॅनेजर असलेल्या सरकारमान्य देशी दारूच्या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील देशी दारूच्या बाटल्यांची चोरी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

- Advertisement -

पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील घरफोडी गुन्ह्यांचा तपास लावण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुषंगाने पो.नि. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात व पोलीस अंमलदार फुरकान शेख, सागर ससाणे, अमृत आढाव, सुनिल मालणकर, भगवान थोरात, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, मेघराज कोल्हे व अरूण मोरे यांच्या पथकास आरोपीचा शोध घेण्यास रवाना केले. पथकाने घटनेच्या ठिकाणी जाऊन सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना, दि.19 मार्च रोजी सदरचा गुन्हा अनिल नंदू पवार (रा.शिरसगाव, ता.श्रीरामपूर) याने त्याच्या साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले.

पथकाने बातमीदारामार्फत अनिल नंदू पवार याची माहिती घेतली असता तो व त्याचे साथीदार अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो (क्र. एमएच-12-आरएन-3432) मधून नेवासा येथून घोडेगाव मार्गे अहिल्यानगर येथे जाणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ घोडेगाव फाटा येथे सापळा रचुन थांबलेले असताना संशयीत टेम्पो मिळून आला. त्यास थांबवून रोडच्या बाजुला घेण्यास सांगितले. तेवढ्यात टेम्पोच्या पाठीमागील बाजुस बसलेले दोन इसम उडी मारून पळून जाऊ लागले. परंतु पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले. त्यांना व टेम्पो मधील दोन इसम असे एकुण चार इसमांना पंचासमक्ष ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता त्यांनी अनिल नंदू पवार (वय 34, रा.शिरसगाव), बाळु मोहन पवार (वय 32, रा.वाळुंज), संदीप बबन बर्डे (वय 37, रा.देहरे), जिवन बाबासाहेब खंडागळे (वय 22, रा.माळीसागज, ता.वैजापूर) असे असल्याचे सांगितले.

आरोपींच्या ताब्यातून 5 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यात 1 अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो व 3 मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ताब्यातील आरोपी अनिल नंदू पवार यास विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता, त्याने त्याच्या साथीदार बाळु मोहन पवार, संदीप बबन बर्डे व बबलु मोहन चव्हाण (रा.कलमपूर, ता.गंगापूर) व साहिल राजेश चव्हाण (रा.माळीसागज) यांच्यासोबत घोडेगाव येथील सरकारमान्य देशी दारूचे दुकान फोडून दारूचे बॉक्स ताब्यातील टेम्पोमधुन चोरून नेले. तसेच घोडेगाव येथे चोरी करण्यापुर्वी दोन-तीन दिवस अगोदर सुपा (ता.पारनेर) येथील बिअर शॉपी फोडून चोरी केल्याची माहिती सांगितली.

आरोपी अनिल नंदू पवार यांच्याकडे गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने चोरी केलेला मुद्देमाल जिवन बाबासाहेब खंडागळे याच्या मध्यस्थिने गौतम वाल्मिक जाधव (रा.महालगाव, ता.वैजापूर), बंडू रामदास मोरे (रा.भगुर, ता.वैजापूर) यांना विकल्याची माहिती सांगितली. ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासकामी सोनई पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन हे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...