Thursday, January 8, 2026
Homeक्राईमदरोड्याच्या तयारीमध्ये थांबलेल्या तिघांना पकडले; दोघे पसार

दरोड्याच्या तयारीमध्ये थांबलेल्या तिघांना पकडले; दोघे पसार

15 लाखांचा मुद्देमाल जप्त || स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिसांची कारवाई

शिरूर |तालुका प्रतिनिधी| Shirur

शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील पुणे-नगर महामार्गावर दरोड्याच्या तयारीमध्ये थांबलेल्या तिघांना कंटेनर वाहन व दरोड्यासाठी वापरल्या जाणार्‍या साहित्यांसह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व शिरुर पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. पकडलेल्या तिघांकडून 15 लाख 17 हजारांचा ऐवज जप्त केला असून पोलिसांची चाहूल लागताच त्यांचे दोन साथीदार पळून गेले आहे.

- Advertisement -

पोलिसांनी कुतुबुद्दीन अख्तर हुसेन (वय 31 वर्षे रा. सोमका, ता. पहरी, जि. भरतपूर, राजस्थान), यासीन हारून खान (वय 32 वर्षे रा. मुदैता, ता. पुन्हाना, जि. नुहू, राजस्थान) व राहुल रशिद खान (वय 32 वर्षे रा. फलैंडी, ता. पुन्हाना, जि. नुहू, राजस्थान) यांसह पळून गेलेले नौशाद उर्फ नेपाळी व लेहकी (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्याविरूध्द गुन्हे दाखल केले. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार संजू ज्ञानदेव जाधव (रा. शिरुर) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

YouTube video player

सरदवाडी ता. शिरूर येथील पुणे-नगर महामार्गावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार संजू जाधव, राजू मोमीन, जनार्दन शेळके व तुषार पंधारे हे रात्री गस्त घालत असताना येथील हरियाना राजस्थान मेवात ढाब्याजवळ काही नागरिक आर जे 52 जि ए 7916 या कंटेनरमध्ये दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य घेऊन दरोड्याच्या तयारीमध्ये थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनतर त्यांनी शिरुर पोलिसांना माहिती देत शिरुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गिरी, पोलीस हवालदार नाथा जगताप, पोलीस शिपाई निखील रावडे, नीरज पिसाळ, नितेश थोरात, विजय शिंदे यांना बोलावून घेत कंटेनरजवळ गेले असता पोलिसांची चाहूल लागताच दोघेजण पळून गेले दरम्यान पोलिसांनी कंटेनरमध्ये पाहणी केली असता त्यामध्ये दरोड्याच्या तयारीत असलेले तिघेजण मिळून आले.

त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ गॅस सिलेंडर, कटावणी, लोखंडी गज, दोरी आदी साहित्य मिळून आले. दरम्यान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील कंटेनर तसेच दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य असा तब्बल पंधरा लाख सतरा हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गिरी करत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : ‘वारसां’ना किती मिळणार मतदारांची ‘पसंती’?

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महानगरपालिका निवडणूक (Mahapalika Election) म्हटले की, केवळ पक्षीय राजकारण नव्हे, तर स्थानिक समीकरणे, आरक्षणाचे गणित आणि राजकीय वारसा यांचीही चर्चा...