Sunday, April 27, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime News : चाकूने वार करुन लाखोंची लूट

Nashik Crime News : चाकूने वार करुन लाखोंची लूट

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

- Advertisement -

शहरातील मॉल व व्यावसायिकांची रोकड व चेक बँकेत जमा करण्यासाठी दुचाकीवरुन नाशिकला निघालेल्या चेन्नईच्या रेडियन्ड कॅश मॅनेजमेंट लि. च्या सेवकावर चाकुने वार करत लाखोंची रोकड लुटल्याची घटना सोमवारी (दि. 29) दुपारी 12.45 वाजेच्या सुमारास घडली. महामार्गावर दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने नागरिकांसह दररोज दुचाकीवरुन नाशिक-सिन्नर असा प्रवास करणार्‍या दुचाकीस्वारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सागर नंदु चौधरी (32) रा. पळसे हे रेडियन्ड कंपनीच्या पुणे शाखेमध्ये कॅश एक्सिक्युटिव्ह म्हणून काम करतात. सिन्नर शहर व ग्रामीण भागातील मॉल व अनेक व्यावसायिकांनी त्यांच्याकडील रोजची जमा होणारी रोकड व चेक बँकेत भरणा करण्यासाठी कंपनीसोबत करार केलेला आहे. चौधरी हे तालुक्यातील व्यावसायिकांकडून रोजची जमा होणारी रोकड व चेक जमा करुन नाशिक येथील बँकेत जमा करण्याचे काम करतात.

सोमवारी त्यांनी येथील रिलायन्स रिटेल मॉलमधून 3 लाख 16 हजार 570 रुपये, कॉईन एक्सप्रेस लि. या कुरिअर कंपनीकडून 2 लाख 68 हजार 104 रुपये, अ‍ॅमेझॉन कुरिअर कंपनीकडून 1 लाख 68 हजार 742 रुपये अशी एकुण 7 लाख 53 हजार 416 रुपयांची रोकड व येस बँकेचे क्लिअरिंगसाठी असलेले चेक घेऊन आपल्या दुचाकीने दुपारी नाशिकला जात होते. मोहदरी गावाजवळ असलेल्या गतीरोधकाजवळ आल्यानंतर त्यांच्या पाठीमागून नंबर नसलेल्या दोन दुचाकींवरुन सहा अनोळखी इसम येत होते. त्यातील एका दुचाकीवर पाठीमागे बसलेल्याने चौधरी यांच्या पाठीवर चाकुने वार करुन दुखापत केली. त्यावर चौधरी यांनी दुचाकी थांबवली असता सहा चोरट्यांनी त्यांच्याकडे असलेल्या हॉकी स्टिकने व लाथाबुक्क्यांनी चौधरी यांना मारहाण करत त्यांच्याजवळ असलेली पैशांची बॅग हिसकावून तेथून पळ काढला.

चौधरी यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले. चौधरी यांच्या पाठीवर वार केल्याने ते जखमी झाल्याचे बघून स्थानिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याप्रकरणी रात्री उशीरा चौधरी यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात सहा अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरिक्षक यशवंत बाविस्कर करत आहेत.

प्रवाशांमध्ये भीती
सिन्नरहून दररोज कामानिमित्त व खरेदीसाठी हजारो नागरिक ये-जा करत असतात. त्यातील शेकडो नागरिक दुचाकीवरुनच ये-जा करतात. मात्र, दिवसाढवळ्या मोहदरी गावाजवळ घडलेल्या या घटनेने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मोहदरी परिसरात महामार्गाच्या दुतर्फा पेट्रोल पंप, अनेक हॉटेल्स व नागरिकांची घरे असून चोरट्यांनी दिवसाढवळ्या दुचाकीस्वारावर चाकुने वार करुन त्याला लुटल्याने आश्चर्यही व्यक्त होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ladki Bahin Yojana : “लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देऊ…”; मंत्री...

0
मुंबई | Mumbai लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महायुतीला (Mahayuti) बसलेल्या झटक्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने लागू केली. या...