Saturday, May 4, 2024
Homeनाशिकघरफोडीच्या संशयितास मुद्देमालासह अटक

घरफोडीच्या संशयितास मुद्देमालासह अटक

नाशिक । Nashik

अंबड पोलिसांनी (Ambad police) घरफोडी (robbery) करणाऱ्या संशयितासह मोटारसायकल चोराला (Thief) ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सोन्यासह एक दुचाकी असा सुमारे अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केला…

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीतील प्रविण पोपट गुंजाळ (Pravin Popat Gunjal) (रा. कामटवाडा धन्वंतरी कॉलेजच्या मागे कामटवाडा नाशिक) यांच्या घरात (दि. ६ जून २०२२) अज्ञात चोरट्याने प्रवेश करून त्यांच्या घरातील ६५ ग्रॅम सोने चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच (दि. २८ जून २०२२) ठक्का करभारी कोल्हे (५०, रा साईबाबा नगर महाकाली चौक पवननगर नवीन नाशिक) यांची दुचाकी संभाजी स्टेडीयम,बुरकुले हॉलजवळ पार्किंग केलेली असतांना अज्ञात चोरट्यांनी चोरी केलेली होती. त्यावरून अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर घरफोडी व मोटार सायकल चोरी गुन्हयांतील संशयितांबाबत पोलीस शिपाई राकेश राऊत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वपोनी भगीरथ देशमुख,पोलीस निरीक्षक नंदन बगाडे,पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश शिंदे, किरण गायकवाड, हेमंत आहेर, मच्छिंद्र वाघचौरे, जर्नादन ढाकणे, प्रशांत नागरे, योगेश शिरसाठ, मुकेश गांगुर्डे,संदिप भुरे, प्रविण राठोड, तुळशीराम जाधव, किरण सोनवणे, मोतीराम वाघ आदींच्या पथकाने सापळा रचून घरफोडीतील संशयीत राहुल धनराज बडगुजर (२६,रा लक्ष्मी स्वीटमागे त्रिमुर्ती चौक नवीन नाशिक) याला ताब्यात घेवून त्याच्याकडून ४०.०९० ग्रॅम सोन्याची लगड जप्त केली. तसेच अन्य दोन संशयितांना पकडून चौकशी केली असता त्यांनी केलेली एक मोटार सायकल असा २ लाख ५० हजार लाख मुद्देमाल जप्त करून घरफोडी व मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड केले.

दरम्यान, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Commissioner of Police Jayant Naiknavare) उपायुक्त विजय खरात (Deputy Commissioner Vijay Kharat) सहाय्यक आयुक्त सोहेल शेख,अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी भगीरथ देशमुख (Bhagirath Deshmukh) पोलीस निरीक्षक नंदन बगाडे, पोलीस निरीक्षक श्रीकांत निबांळकर (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली घरफोडीच्या गुन्हयाचा तपास पोलीस नाईक किरण देशमुख व मोटारसायकल चोरीचा तपास हरूण शेख करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या