Saturday, May 4, 2024
Homeक्रीडाAsian Games 2023 : रोहन बोपन्ना-ऋतुजा भोसले जोडीचा चीनमध्ये जलवा; टेनिसमध्ये भारताला...

Asian Games 2023 : रोहन बोपन्ना-ऋतुजा भोसले जोडीचा चीनमध्ये जलवा; टेनिसमध्ये भारताला मिळाले ‘गोल्ड मेडल’

नवी दिल्ली | New Delhi

चीनमधील हांगझोऊ (Hangzhou in China) येथे सुरु असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games) सातव्या दिवशी भारताची सुरुवात चांगली झाली आहे. भारताने टेनिसमध्ये (Tennis) साकेथ मिनेनी आणि रामनाथन रामकुमार यांच्या रौप्यपदकानंतर मिश्र दुहेरीत रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले या जोडीने उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदकावर (Gold Medal) नाव कोरले आहे. टेनिसमधील हे पहिले तर भारताचे एकूण नववे सुवर्णपदक आहे…

- Advertisement -

Lok Sabha Election : मिशन ४५ साठी भाजपचा मेगाप्लॅन; ‘या’ विद्यमान आमदारांना उतरवणार रिंगणात

रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले (Rohan Bopanna and Rituja Bhosale) या जोडीने अंतिम सामन्यात एन शो लिआंग आणि संग हाओ हुआंग या जोडीचा २-६, ६-३, १०-४ असा पराभव केला. सामना टायब्रेकरपर्यंत गेला आणि अखेरीस भारतीय जोडीने रोमहर्षक विजयाची नोंद केली. या दोघांचाही पराभव करुन देशासाठी या खेळांमध्ये ९ वे सुवर्णपदक जिंकले.

भारताला पहिल्या सेटमध्ये २-६ ने पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर भारतीय जोडीने शानदार पुनरागमन केले. दुसरा सेट भारतीय जोडीने जिंकला आणि तिसरा सेट टायब्रेकरपर्यंत पोहोचला. यासह भारताने हा सामना टायब्रेकरमध्ये १०-४ असा जिंकून भारताच्या (India) खात्यात सुवर्णपदक जमा केले. रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांच्या कामगिरीमुळे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

Killari Earthquake : किल्लारी भूकंपाला ३० वर्षे पूर्ण; नेमकं काय घडलं होतं १९९३ साली? वाचा सविस्तर

दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकतालिकेचा विचार केल्यास भारत अजूनही चौथ्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत ९ सुवर्ण, १३ रौप्य आणि १३ कांस्य असे एकूण ३५ पदके जिंकली आहेत. तर यजमान चीनने १०६ सुवर्ण, ६५ रौप्य आणि ३३ कांस्य पदके जिंकून अव्वल स्थान पटकावले आहे. तर २८ सुवर्णांसह जपान आणि २७ सुवर्णांसह दक्षिण कोरिया अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

OBC Reservation : ओबीसी महासंघाचे २१ दिवसानंतर उपोषण मागे; OBC आरक्षणाला धक्का लागणार नाही, फडणवीसांचे आश्वासन

- Advertisment -

ताज्या बातम्या