Friday, December 6, 2024
Homeमुख्य बातम्याखडसे-फडणवीसांवरुन यांच्यात रंगले टि्वटर वॉर

खडसे-फडणवीसांवरुन यांच्यात रंगले टि्वटर वॉर

जळगाव

पुर्वाश्रमीचे भाजप नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. ‘देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून माशासारखे तडफडत आहेत’ अशा शब्दात एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर टीका केली होती. त्यानंतर फडणवीस समर्थक सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते व एकनाथ खडसे यांच्या कन्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे खेवलकर यांच्यात टि्वटर वॉर रंगले आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे भाजपमध्ये होते. परंतु देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यातील कलहामुळे भाजप सोडून ते राष्ट्रवादीत दाखल झाले. भाजपमध्ये असतांनाच ते देवेंद्र फडणवीस यांच्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नव्हते. राष्ट्रवादीत आल्यावर अनेक वेळा त्यांनी फडणवीस यांच्यावर (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्ले चढवले.

देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून माशासारखे तडफडत आहेत. ते ब्राम्हण असले तरी त्यांची सरकार पडणार असल्याची भाकिते खरे ठरणार नाही. सत्ता कधी येईल यासाठी त्यांना रात्री बेरात्री स्वप्न पडत असेल. सध्या सरकार पडणार असे ते सांगत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या तारखांचे भाकीत करत आहेत. ते ब्राम्हण असल्याने त्यांचे भाकीत खरे ठरणार नाही, अशी टीका खडसे यांनी केली होती.

खडसे यांच्या या टीकेला उत्तर देताना माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांनी खडसेंवर हल्लाबोल चढवला होता. त्यावर राम सातपुते यांनी टि्वट केले. त्यात त्यांनी म्हटले की, “नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्र भाऊ बद्दल बोलत आहात. विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार. निष्कलंक देवेंद्रजीवर बोलण्या अगोदर आरसा बघा सगळं लक्षात येईल.”

रोहिणी खडसे यांचे उत्तर

आमदार राम सातपुते यांच्याकडून सोशल मीडियावर झालेल्या वॉरवर खडसे यांच्या बाजूने त्यांच्या कन्या व राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे खेवलकर उतरल्या. त्यांनी सातपुते यांच्या टि्वटचा आधार घेत म्हटले, “जर पैसे खात होते तर मग सत्ता होती तेव्हा कारवाई का केली नाही?तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का?आणी असेल तुमच्यात हिंमत तर सिद्ध करा ना ? शामराव फडणविशी मिरची तुम्हाला का झोँबली?ज्यांचे बद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची गुळणी आहे का?”

राम सातपुतेंची पुन्हा टीका

यानंतरही सातपुते यांनी दुसर्‍यांदा ट्वीट करत “ताई भोसरी जमीन घोटाळ्यामुळे मंत्रीपद गेलं ना हो नाथाभाऊंचं. या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तीच कारवाई झाली ना तेव्हा. आणि यामुळेच आपला 2019 ला मुक्ताईनगरच्या जनतेने पराभव केला. कशाला बोलायला लावता ताई..? बात निकली ही है तो दूर तक जायेगी ..!” असा टोला लगावला.

रोहिणी खडसेंचा पुन्हा हल्ला

राम सातपुते यांच्या टीकेला पुन्हा रोहिणी खडसे यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, “ मंत्रिपद काढले.. जर भोसरी प्रकरणात दोषी होते तर चौकशी समितीचा अहवाल विधिमंडळात का मांडला नाही ? दूध का दूध पानी का पानी केले असते”

भाजपचे दुसरे आमदार मैदानात

अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांनीही राम सातपुते व रोहिणी खडसे यांच्यातील वादात उडी घेतली. त्यांनी म्हटले, “अहो

@RamVSatpute भाऊ ताईंना नागपूरी फडणवीसांनी @EknathGKhadse भाऊंना घरी बसवलं म्हणजे त्यांच्या कर्मामुळेचं हे माहिती नाही वाटत. @Dev_Fadnavis जी च्या नेतृत्वाखाली मंत्री असताना बरं वाटल अन काढलं की त्यांची जात काढायची, हे बरं आहे यांचं….

सोशल मीडियावर सुरु असलेल्या या वॉरची चर्चा आता जळगाव जिल्ह्यास राजकीय क्षेत्रात चांगली रंगली आहे. फडणवीसांच्या पाठिशी भाजप आमदार उतरले असतांना खडेस यांची बाजू त्यांच्या कन्याच लावून धरत होत्या.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या