Thursday, May 23, 2024
Homeमुख्य बातम्याRohit Pawar : "अजित पवार अर्थमंत्री पण फडणवीसांकडून..."; रोहित पवारांचा गंभीर आरोप

Rohit Pawar : “अजित पवार अर्थमंत्री पण फडणवीसांकडून…”; रोहित पवारांचा गंभीर आरोप

मुंबई | Mumbai

काही महिन्यांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह बडे नेते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सहभागी झाल्यामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर ९ आमदारांना वजनदार खाती मिळाली. यात अजित पवारांना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपद मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जरी अर्थमंत्रीपद असले तरी अजित पवारांच्या खात्यावर अंकुश ठेवला जात असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी निधीवाटपावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे….

- Advertisement -

NCP News : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार-अजित पवार एकाच व्यासपीठावर; कार्यक्रमात काय बोलणार?

रोहित पवारांनी आपल्या ‘एक्स’ (ट्वीटर ) अकाउंटवर म्हटले आहे की, “माझ्या मतदारसंघातील कर्जत आणि जामखेड या दोन्ही ठिकाणच्या शासकीय रुग्णालयांचे काम अर्धवट होऊन निधीअभावी ठप्प झाले आहे. अर्थमंत्री अजितदादा आहेत, मात्र या रुग्णालयासाठी आपल्या संमतीशिवाय निधी द्यायचा नाही, अशा सूचना फडणवीस साहेब आपण दिल्यात. हा आपल्या समकक्ष असलेल्या अजितदादांच्या खात्यावर अंकुश ठेवण्याचा प्रकार असून तो योग्य वाटत नाही. दुसरं म्हणजे उपचाराअभावी एखाद्याचा बळी गेल्यास त्याची जबाबदारी आपण आणि आरोग्यमंत्री घेणार का?” असा सवाल देखील रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

Nashik Yeola Crime News : येवल्यात तीन ठिकाणी दरोडा, अनेकांना मारहाण करत लुटले लाखो रुपये

पुढे रोहित पवारांनी म्हटले आहे की, “राजकारण तर आपण नेहमीच एकमेकांच्या विरोधात करतो. पण, ते विचारांचे आणि तत्त्वांचे असावे. राजकारणा पायी सामान्य माणूस भरडला जाऊ नये, हे आपल्यासारख्या मोठ्या नेत्याला सांगण्याची वेळ यावी, यापेक्षा दुर्दैव ते काय! हे शेअर केलेले फोटो बघितले तर इतके काम होऊनही १ रुपयाही निधी दिलेला नाही आणि अशीच अवस्था राज्यातील इतर २६ कामांचीही आहे. मायबाप सरकार हे आपल्याला तरी योग्य वाटतं का?” असा प्रश्न रोहित पवारांनी विचारला आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई पोलीस ड्रग्ज माफिया ललित पाटीलला घेऊन नाशकात; कारखान्याच्या ठिकाणी केली चौकशी

- Advertisment -

ताज्या बातम्या