Thursday, November 21, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : "घरापेक्षा दरवाजे-खिडक्या महाग"; रोहित पवारांचा महायुती सरकारला टोला

Maharashtra Politics : “घरापेक्षा दरवाजे-खिडक्या महाग”; रोहित पवारांचा महायुती सरकारला टोला

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा २ कोटी ४० लाख रुपयांचा पुतळा अनावरण कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी तात्पुरते हेलिपॅड उभारण्याचा खर्च आहे २ कोटी २ लाख रुपये … वारेSS व्वाSS सरकार! घरापेक्षा दरवाजे-खिडक्या महाग! असाच या सरकारचा दळभद्री कार्यक्रम म्हणावा लागेल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी महायुती सरकारला लगावला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Gujarat Floods : गुजरातमध्ये पावसाचे थैमान; २६ जणांचा मृत्यू, तर १८ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तोंडावर म्हणजे फेब्रुवारी २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते मालवण (Malvan) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोदी तसेच अन्य अति महत्वाच्या पाहुण्यांच्या हेलिकॉप्टरला उतरण्यासाठी मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारात तात्पुरते हेलिपॅड उभारण्यात आले होते. या हेलिपॅडवर सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या खर्चाचा मुद्दा रोहित पवार यांनी गुरुवारी एक्स या समाज माध्यमाद्वारे उपस्थित केला.

 हे देखील वाचा : “आदिवासी असल्यामुळेच माझ्यावर…”; ऑलिम्पिक धावपटू कविता राऊतचा सरकारवर गंभीर आरोप

त्यासोबतच ७८ लाख, ४४ लाख अणि ७९ लाख रुपये असा खर्च तीन तात्पुरते हेलिपॅड (Helipad) उभारण्यासाठी राज्य सरकारने केला. सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे टेंडर डिसेंबर २०२३ मध्ये निघाले आणि कार्यारंभ आदेश मात्र दोन महिने आधीच म्हणजे सप्टेंबर २०२३ मध्ये देण्यात आले. याचाच अर्थ गाव वसण्याआधीच लुटेरे हजर होते. तात्पुरते  हेलिपॅड उभारण्यासाठी एवढा खर्च येतो का आणि दलाली खाण्यासाठी एवढ्या किमतीचे टेंडर काढले जाते का? यावर संशोधन होणे गरजेचे आहे. राज्य सरकारने यावर उत्तर द्यावे, असे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या