Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजRohit Pawar: संजय राऊतांच्या पवारांवरील टीकेवर रोहित पवारांची सावध प्रतिक्रिया; म्हणाले…

Rohit Pawar: संजय राऊतांच्या पवारांवरील टीकेवर रोहित पवारांची सावध प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई । Mumbai

दिल्लीत मंगळवारी झालेल्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. यावेळी भाषणात शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले.

- Advertisement -

या कौतुकानंतर शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. या टीकेनंतर थेट पवार कुटुंबातूनच प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालीये. दिल्लीतील कार्यक्रमावरून संजय राऊत यांच्यासारख्या नेत्याने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे, असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे.

रोहित पवार म्हणाले की, दिल्लीतील कार्यक्रमावरून संजय राऊत साहेबांसारख्या मोठ्या राजकीय नेत्याने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्राला स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभली असून स्व. बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पवार साहेब यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांनी ही परंपरा पुढे नेली, सामाजिक-सांकृतिक कार्यक्रमांना राजकीय मतभेदाचा कधीही अडसर ठरू दिला नाही तसेच महाराष्ट्राची सामाजिक व सांकृतिक वीण अधिक घट्ट करण्यावर नेहमीच भर दिला.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, पण मागील दोन-तीन वर्षात भाजपाने कलुषित केलेले राजकारण, महाराष्ट्राच्या अस्मितेशी केलेली छेडछाड बघता यामुळंच संजय राऊत साहेबांनी तडकाफडकी ही प्रतिक्रिया दिली असावी!.

काल दिल्लीतील एका सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यावरून आता महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांनी आपली नाराजी आज उघडपणे व्यक्त केलीय. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस कडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. खासदार संजय राऊत म्हणाले होते की, ” शरद पवारांनी शिंदेंचा नाही तर महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्या अमित शाहांचाच सत्कार केलाय. गद्दारांना असे सन्मान देणे म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का आहे. पवारांनी शिंदेंच्या कार्यक्रमाला जायला नको होतं. राज्याचं राजकारण विचित्र दिशेनं चाललं आहे. ठाण्याचा विकास हा शिवसेनेनं केला. शरद पवारांना ठाण्याबाबत चुकीची माहिती आहे. पवारांबाबत आम्ही आमच्या पक्षाच्या भावना मांडल्या आहेत. दिल्लीमध्ये साहित्य संमेलन नाही तर राजकीय दलाली सुरू आहे. आता शिंदेंसारखे आंतरराष्ट्रीय दलाल पवार साहेबांसोबत आहेत,” असंही संजय राऊत म्हणालेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...