Friday, July 12, 2024
Homeमुख्य बातम्या'युवा संघर्ष यात्रा' स्थगित, रोहित पवारांची घोषणा... कारण काय?

‘युवा संघर्ष यात्रा’ स्थगित, रोहित पवारांची घोषणा… कारण काय?

शिरूर | Shirur

- Advertisement -

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्यातील युवकांच्या प्रश्नांसाठी युवा संघर्ष यात्रा सुरु केली होती. पण आता ही यात्रा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय रोहित पवार घेतला आहे.

राज्यातील मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं यावेळी रोहित पवारांनी सांगितलं. मराठा आरक्षणासाठी सगळे जण प्रयत्न करत आहेत, त्यांना साथ देणं गरजेचं आहे, त्यामुळे यात्रा स्थगित केली असल्याचं यावेळी रोहित पवारांनी म्हटलं. तसेच या मुद्दा सोडवण्यासाठी रोहित पवार यांनी विशेष अधिवेशनाची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

जरांगे पाटलांनी पुकरालेल्या आंदोलानाची परिस्थिती दिवसागणिक तीव्र होत आहे. त्यामुळे त्यांची परिस्थिती, राज्यातील आंदोलनाची परिस्थिती आणि युवकांची स्थिती पाहता हा निर्णय घेणं गरजेचं असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं. तसेच राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अनेक तरुणांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या देखील केली, या सगळ्या चिंताजनक परिस्थितीमुळे रोहित पवारांनी त्यांची यात्रा स्थगित केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या