Sunday, November 17, 2024
Homeराजकीयशेलारांच्या टीकेला रोहित पवारांचे प्रतिउत्तर; म्हणाले...

शेलारांच्या टीकेला रोहित पवारांचे प्रतिउत्तर; म्हणाले…

मुंबई | Mumbai

अंतिम वर्षाच्या, अंतिम सत्राच्या परीक्षा होणार की नाहीत? याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज दिला असून कोर्टाने परीक्षा रद्द केली जाऊ शकत नाही असे सांगितले आहे. यावरूनच भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत महाराष्ट्र सरकारवर जहरी टीका केली आहे.

- Advertisement -

न्यायालयाच्या निकालानंतर भाजपने ठाकरे सरकारला घेरले

शेलार यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिउत्तर दिले आहे. रोहित पवार यांनी म्हंटले आहे की,”आमची परिक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही तर विद्यार्थ्यांच्या काळजीपोटीच होती व राहील. पण आशिष शेलारजी बबड्याची सिरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर तुम्हालाही हे पटलं असतं.आता त्यासाठी किमान आपल्या tweet खालील रिप्लाय तरी वाचाल.” असे प्रतिउत्तर यांनी दिले आहे.

शेलार यांनी ट्विट करत म्हंटले होते की, “कुलपती म्हणून राज्यपालांना, कुलगुरूंना विश्वासात घेतले नाही. शिक्षण तज्ञांची मते धुडकावली. युजीसीला जुमानले नाही. मंत्री मंडळात चर्चा केली नाही. विद्यार्थ्यांना अखेरपर्यंत वेठीस धरले. अहंकारातून विद्यार्थ्यांचे एवढे महिने नुकसान केले. काय साध्य केले?,’ असा सवाल शेलारांनी ट्विट करून विचारला होता. ‘एका “बबड्याच्या” हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला,’ असा टोला शेलार यांनी लगावला होता.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या