Tuesday, October 22, 2024
Homeक्रीडाBorder-Gavaskar Trophy : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीला...

Border-Gavaskar Trophy : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीला मुकणार?

नाशिक | Nashik
भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर – गावस्कर कसोटी मालिका २२ नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे. पण ही मालिका सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांपैकी एक सामना खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, रोहित पहिल्या किंवा दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे म्हटले आहे. रोहित सुरूवातीच्या दोन कसोटी सामन्यांपैकी एक सामना खेळणार नसल्याची माहिती त्याने बीसीसीआयला दिली आहे.

विशेष म्हणजे भारतीय संघ ३ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी क्रिकेट मालिका खेळणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिला सामना २२ नोव्हेंबर पासून पर्थ मध्ये खेळविण्यात येणार आहे. तर दुसरा सामना ६ डिसेंबर पासून अॅडिलेड येथे खेळविण्यात येणार आहे. २०१४ पासून ऑस्ट्रेलियामध्ये एकही मालिका भारताने गमावलेली नाही.

- Advertisement -

रोहित शर्मा खेळू न शकल्यास कर्णधार म्हणून भारतीय संघाकडे रिषभ पंत, लोकेश राहुल, शुभमन गील हे तीन पर्याय उपलब्ध आहेत. भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी स्वतः म्हटले आहे. तसेच रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सलामीवीर फलंदाज म्हणून लोकेश राहुल आणि शुभमन गील हे दोन्ही अनुभवी खेळाडू संघात आहेत.

तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणारा अभिमन्यू ईश्वरन हा देखील भारत अ संघासोबत ऑस्ट्रेलिया जाणार आहे. यासोबतच, रजत पटिदार आणि देवदत्त पडिकल या दोन्ही खेळाडूंना भारताने कसोटी क्रिकेट संघात संधी दिली आहे.दोन्ही खेळाडू सलामीवीर म्हणून जवाबदारी पार पाडू शकतात. रोहित शर्मा ने १८ कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे.१२ सामन्यात विजय संपादन केला आहे. तर ४ सामने गमावले आहेत. २ सामने अनिर्णित राहिले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या