Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडारोहित शर्माने युजवेंद्र चहल'ला दिल्या लग्नाच्या हटके शुभेच्छा, म्हणाला..

रोहित शर्माने युजवेंद्र चहल’ला दिल्या लग्नाच्या हटके शुभेच्छा, म्हणाला..

मुंबई l Mumbai

फिरकीपटू युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात होता. तर यावेळी ऑस्ट्रेलियात भारताला ट्वेन्टी-20 मालिका जिंकवून देण्यात चहलचे महत्त्वाचे योगदान होते. मात्र, त्यांनतर चहल कसोटी मालिकेपूर्वी भारतात परतला होता.

- Advertisement -

दरम्यान, युजवेंद्र चहल २२ डिसेंबर रोजी धनश्री वर्मासोबत (Dhanashree Verma) विवाहबंधनात अडकला. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत दोघांचा विवाहसोहळा पार पडला. चहलने स्वतः इंस्टाग्रामद्वारे माहिती जाहीर केली. त्यानंतर चाहते आणि खेळाडूंनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.

या दरम्यान, भारताचा सलामीवीर व मर्यादित ओव्हर संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) हटके अंदाजात चहलला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. रोहितने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, ‘अभिनंदन भावा, दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा. तू तुझ्या गुगली तिला न टाकता विरोधी संघांसाठी राखून ठेव.

फिरकीपटू युजवेंद्र चहलने याने काही दिवसांपूर्वी त्याची मैत्रीण धनश्री वर्माशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचा साखरपुडा सोहळाही पार पडला होता. चहलची जोडीदार धनश्री वर्मा मुंबईची रहिवासी आहे. चहल आणि धनश्री मागील अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन नेहमीच अपलोड करत आले आहेत. या दोघांच्या फोटोंना त्यांच्या चाहत्यांकडून लाखोंनी लाईक्स मिळतात. युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा व्यवसायाने डेंटिस्ट, कोरिओग्राफर आणि यूट्यूबर आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने मोठा काळ एकमेकांसोबत घालवलेला आहे. त्यानंतर त्यांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. बुधवारी त्यांचे लग्न झाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या