Monday, July 1, 2024
Homeनगररोहयो महाघोटाळा प्रकरणी ‘खुलासे’ झेडपीकडे धावले

रोहयो महाघोटाळा प्रकरणी ‘खुलासे’ झेडपीकडे धावले

कर्जत तालुक्यातील तपासणी पूर्ण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीची धावपळ, आचारसंहिता याचा फायदा घेत पाथर्डी आणि जामखेड पंचायत समितीमधून पात्र नसलेल्या, तसेच बोगस लाभार्थी दाखवून रोहयो योजनेतून विहीरींचा महाघोटाळा घातल्याचे समोर आले होते. याप्रकरणी मागील महिन्यांत तीन गटविकास अधिकारी यांच्या 21 अधिकारी-कर्मचार्‍यांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. यातील काही जणांचे खुलासे जिल्हा परिषद प्रशासनाकडे येण्यास सुरूवात झाली आहे.

दरम्यान, जामखेड-पाथर्डी पाठोपाठ कर्जत तालुक्यात रोहयोच्या विहीरी मंजूर करतांना घोळ घालण्यात आल्याच्या तक्रारी आल्यानंतर विशेष पथकामार्फत जिल्हा परिषद पातळीवर कर्जत तालुक्यातील मंजूरी विहीरीच्या कामांची तपासणी करण्यात आली. तपासणीचे हे काम पूर्ण झाले असून सोमवार (दि.10) रोजी याबाबतचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जाणार असल्याची शक्यता आहे. दुसरीकडे पाथर्डी आणि जामखेड तालुक्यात महाघोटाळे घालणार्‍यांपैकी पाथर्डी तालुक्यातील अधिकारी दोन दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात चकरा मारत होते. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे स्वत: खुलासा सादर करण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहिती सुत्रांनी दिली. तर उर्वरित काहींनी जिल्हा परिषदेच्या टपालात खुलासे सादर केलेले आहे. कोणत्याही परिस्थिती येत्या दोन दिवसांत नोटीस बजावण्यात आलेल्या 21 जणांना खुलासे सादर करावे लागणार आहेत. त्यानंतर आलेले खुलासे आणि ठेवण्यात आलेला ठपका याचा अभ्यास करून खुलासे मान्य कराचे की अमान्य कराचे याचा निर्णय प्रशासन घेणार आहेत. त्यानंतर कारवाईची पुढील दिशा ठरणार आहे.

मागील एक ते दीड महिन्यांत रोजगार हमीतून मंजूर करण्यात आलेल्या विहीरीच्या कामात महाघोटाळा झाल्याची तक्रार झाल्यानंतर केलेल्या तपासणीनंतर जिल्हा परिषद प्रशासनाने जामखेडचे गटविकास अधिकारी, पाथर्डीचे दोन प्रभारी गट विकास अधिकारी अशा तीन अधिकार्‍यांसह दोनही तालुक्यातील 21 रोहयो कर्मचारी, लिपीक यांना नोटीस बजावली होती. जिल्ह्यात प्राथमिक तपासणी सुमारे 750 विहीरीच्या मंजूरी अथवा कामात अनियमितता झालेल्य समोर आले असून या प्रकरणात एका विहीरीसाठी 4 लाख रुपयांचे अनुदान आहे. यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या