Tuesday, January 6, 2026
Homeनगररोटाव्हेटर अंगावर पडल्याने कृषी पदवीधर तरुण शेतकर्‍याचा मृत्यू

रोटाव्हेटर अंगावर पडल्याने कृषी पदवीधर तरुण शेतकर्‍याचा मृत्यू

पाचेगाव फाटा |वार्ताहर| Pachegav Phata

रोटाव्हेटरद्वारे शेतात मशागत सुरु असताना रोटाव्हेटरमध्ये अडकलेले गवत काढत असताना रोटाव्हेटर अंगावर पडून कृषी पदवीधर शेतकरी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील पुनतगाव येथे घडली. पुनतगाव येथील युवराज दिलीप वाकचौरे (वय 26) हा काल सोमवार दि 21 डिसेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास शेतात ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटावेटर मारण्याचे काम चालू असताना रोटावेटर मधील गवत व माती काढत असताना रोटावेटर अचानक अंगावर पडून जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाकचौरे यांची पाचेगाव शिवारात तीन किलोमीटर अंतरावर शेतजमीन आहे. त्या शेतात गहू टाकण्यासाठी दिलीप वाकचौरे यांचा एकुलता एक मुलगा युवराज हा सकाळी आपला स्वतःचा आयशर कंपनीचा ट्रॅक्टर घेऊन रोटावेटरचे काम करीत होता.त्यात रोटावेटर मध्ये गवत व मातीचे पेंड लागल्याने युवराज याने ट्रॅक्टर उभा करून पेंड काडीत असताना रोटावेटर त्यांच्या अंगावर पडला असता तो रोटावेटर खाली सापडून त्याचा जागीच मृत्यू झाला.

YouTube video player

युवराज हा सुशिक्षित तरुण होता.त्याचे मागील वर्षी बी. एससी अ‍ॅग्री पूर्ण होऊन तो आपली शेती करीत होता. फेब्रुवारी 2025 मध्ये म्हणजे दहा महिन्यांपूर्वी युवराज याचे लग्न शेवगाव तालुक्यात झाले होते. घरच्यांनी वारंवार फोन केला असतानाही युवराज याने फोन घेतला नाही म्हणून त्याचा चुलतभाऊ प्रदीप विलास वाकचौरे हा शेतात पाहायला गेला असता तो रोटवेटरच्या खाली अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान ही घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली.

युवराज याचा मृतदेह नेवासा फाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन पाठवण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्रात गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. युवराजच्या पश्चात आई, वडील,पत्नी, बहीण, आजी, आजोबा, चुलते, चुलत भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे. रात्री उशीराने पुनतगाव येथे युवराजचा मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आला.

ताज्या बातम्या

रविंद्र

“माझ्या त्या वक्तव्याकडे…”; विलासरावांवरच्या ‘त्या’ वक्तव्यावर रविंद्र चव्हाणांची आज एका वाक्यात...

0
छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarमहाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, अशी भाषा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विलासरावांचा...