Thursday, May 15, 2025
Homeक्रीडाराऊंड द विकेट : हरले तरीही जिंकले...

राऊंड द विकेट : हरले तरीही जिंकले…

डॉ. अरुण स्वादी

- Advertisement -

अफगाणिस्तानचे क्रिकेट आता उमलू लागले आहे. डवरू लागले आहे आणि काही दिवसातच ते सुजलाम् सुफलाम् होणार, असे दिसत आहे. या विश्वचषक स्पर्धेत अपेक्षेपेक्षा मोठी कामगिरी केलेल्या एका संघाचे नाव घ्यायचे म्हटले तर ते अफगाणिस्तानच्या संघाचेच घ्यायला लागेल. त्यांनी आपला खेळ खूप उंचावला आहे.

या स्पर्धेत त्यांना यापूर्वी एकमेव विजय मिळवता आला होता आणि तोही स्कॉटलंडसारख्या दुबळ्या संघावर, पण यावेळी मात्र त्यांनी कमाल केली. प्रथम इंग्लंडला, मग पाकिस्तानला अशा दोघांनाही धोबीपछाड दिला. श्रीलंकेचीही जिरवली. काल बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघालादेखील कडवी लढत देत त्यांनी शेवटच्या काही षटकांपर्यंत झुंजत ठेवले. कुणी सांगावे मॅक्सवेलचे तुफान आले नसते तर अफगाणिस्तानने उपांत्य फेरीचा दरवाजा ठोठावला असता, पण तसे होणे नव्हते. मात्र त्यांच्या या स्पृहणीय कामगिरीमुळे एक देश क्रिकेटच्या महासत्तेत दाखल होऊ घातला आहे, हेही नसे थोडके!

अफगाणिस्तानची फिरकी गोलंदाजी सुरुवातीपासूनच प्रभावी होती. राशिद खानला तोंड देणे भल्याभल्यांना जमलेले नाही. मुजीब ही तसाच! हे दोघे लेगस्पिनर म्हणजे अफगाणिस्तानची जंगल संपत्ती आहे. त्यात भर पडली आहे नूर मोहम्मदची! हा चायनामन फिरकी गोलंदाज आता उदयाला आलेला आहे आणि जुना ऑफ स्पिनर मोहम्मद नबी अजूनही विकेट काढतो आहे.

जलदगती गोलंदाजीतील त्यांची प्रगती लक्षणीय आहे. फझलन फारुकी, नवीन उल हक, उमरझाई हे डावे-उजवे तेज गोलंदाज आहेत. 140 किलोमीटरच्या वेगाने गोलंदाजी करतात. त्यामुळे एकूणच त्यांच्या गोलंदाजीत आता व्हॅली ऑफ फ्लॉवर्सची विविधता आली आहे. परंतु त्यांची खरी प्रगती झाली आहे त्यांच्या फलंदाजीत! टी-ट्वेंटी क्रिकेटचा पगडा त्यांच्यावर जास्त होता.

पन्नास ओवर क्रिकेटशी जमवून घ्यायला त्यांना फारशी संधी मिळत नव्हती. या स्पर्धेत त्यांनी आपल्या मानसिकतेत कमालीचा बदल केला आणि फलंदाजी करताना पहिले विकेटवर सेट व्हायचे आणि मग हाणामारी करायचे तंत्रज्ञान घोटवले. त्यामुळे अफगाणिस्तानची फलंदाजी विलक्षण दर्जेदार वाटू लागली. गुरबाज फटकेबाज आहे तर झाद्रान विचारपूर्वक डावाची उभारणी करतो. रहमत त्यांचा महत्त्वाचा फलंदाज तर कर्णधार हशमतुल्ला डावरा असल्याने त्याचे वेगळेपण महत्वाचे ठरते. तो खेळतोही शांतपणे!

अजमतुल्ला उमरजाई हा त्यांचा बेस्ट ऑल राऊंडर. प्रत्येक सामन्यात त्याचे अष्टपैलुत्व बहरत गेले. पुढे-मागे हा खेळाडू त्यांच्या संघाचा कणा बनणार यात शंका नाही. नबी, रशीद खान हे त्यांचे गोलंदाज अष्टपैलू खेळाडू! मुजीबही आता चांगली फलंदाजी करतो. त्यामुळे एकूणच फलंदाजीत स्थैर्य आले आहे. त्यातच त्यांच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा ही आता खूप उंचावला आहे. मुख्य म्हणजे जिंकायचे कसे? याची रेसिपी त्यांना मिळाली आहे. योग्य वेळी आक्रमण करायचे आणि इतर वेळी नांगर टाकायचा हे त्यांना आता छान जमायला लागले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rajnath Singh : “धर्म विचारून त्यांनी निरपराधांचा बळी घेतला, आपण कर्म...

0
नवी दिल्ली | New Delhi  जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानमधील...