Monday, November 25, 2024
Homeक्रीडाराऊंड द विकेट : पाँचों उँगलियाँ घी में...!

राऊंड द विकेट : पाँचों उँगलियाँ घी में…!

– डॉ अरुण स्वादी

ज्या वेगाने अफगाणिस्तान प्रगती करीत आहे; ते पाहिल्यावर त्यांना २०३१चे संभाव्य विजेते म्हणायला हरकत नाही. त्यांची गोलंदाजी नेहमीच बलवान होती. फिरकीला तर तोड नव्हती, पण फलंदाजी त्या तुलनेत कमजोर होती. हळूहळू टी-२० मध्ये त्यांच्या फलंदाजीची कळी उमलू लागली, पण वन-डे क्रिकेटमध्ये त्यांना ५० ओवरचा डाव जुळवता येत नव्हता. त्याचे एक कारण होते; ते या प्रकारचे क्रिकेट खूप कमी खेळले आहेत.

- Advertisement -

मात्र या स्पर्धेत त्यांनी फलंदाजीचा बॅलन्स छान साधला आहे. त्यामुळे ते आता बलवान संघ होत चालले आहेत. प्रथम इंग्लंड, मग पाकिस्तान आणि आता श्रीलंका त्यांनी गिळंकृत केली आहे. हे काम त्यांनी नको तितक्या सहजतेने केले आहे. इतर संघांनी त्यांना आता कमजोर कडी समजू नये एवढी कामगिरी त्यांनी सातत्याने केली आहे.

श्रीलंकेचे मंत्रीमंडळ रोज बदलते. काही आठवड्यांपूर्वी मथीशा पथिराणा म्हणजे पोडी मलिंगा त्यांचा स्पेशल बोलर होता. त्याला पाकिस्तानने बडव-बडव बडवले. त्यानंतर तो गुल झाला असावा. थीकस्ना हा फिरकीपटू त्यांचा हुकुमाचा एक्का! तो पण आता परिणामकारक ठरत नाही. तो डावरा वेलालागे आशिया कपचा हिरो होता. आता तो अकरात बसत नाही. अचानक नवे गोलंदाज येत आहेत. चामिरासारखा तेज बॉलर पुन्हा प्रकटतोय. काहींच्या दुखापती, काहींचा हरवलेला फॉर्म यामुळे श्रीलंका खूप दबावाखाली येत आहे. त्यातच कुशल परेराचा फॉर्म हरवलाय. कर्णधार तर केव्हाच जायबंदी होऊन परतला आहे. या परिस्थितीत लंका संघर्ष करीत आहे. हा सामना हरल्यामुळे तो संपला.

हशमतुल्ला शाहीदी मात्र संघावर खुश दिसतो. अझमताईसारखा फास्ट बोलिंग ऑल राऊंडर, झाद्रान, रेहमतसारखे फलंदाज स्वतः कर्णधार जोरात आहेत. मुजीब, राशिद खान आणि नाबीचा त्रिशूळ आक्रमण आहे. फिल्डिंग चांगली होत आहे. ते जिंकत आहेत. आणखी काय पाहिजे आहे त्यांना? इसे कहते है ‘पाँचों उँगलियाँ घी में’…!

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या