मुंबई | Mumbai
ड्रीम इलेव्हन आयपीएलमध्ये शनिवारी पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. हा सामना आज दुपारी ३:३० वाजता करण्यात येणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर गुणतालिकेत ४ गुणांसह पाचव्या तर राजस्थान रॉयल्स ४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. बंगळूरने आपल्या अखेरच्या सामन्यात मुंबईवर सुपर ओव्हरमध्ये मात करून विजयी लय परत मिळवली आहे.
तर पंजाबविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपरकिंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यावर थरारक विजय संपादन करून विजयी सुरुवात केली होती. पण कोलकात्याने राजस्थानवर ३७ धावांनी मात करून त्यांचा विजयीरथ रोखला.
आता बंगळुरवर मात करून आपली विजयी लय परत मिळवण्याचा राजस्थान संघाचा प्रयत्न असेल. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण २१ सामने झाले आहेत. यात राजस्थानने १० बंगळूरने ८ सामने जिंकले आहेत तर ३ सामने अनिर्णित राहिले आहेत.
बंगळूर संघाच्या फलंदाजीची मदार विराट कोहली, एरन फिंच, देवदत्त पडिकल, अब्राहम डिव्हिलिअर्स, पार्थिव पटेल, जोश फिलिप, गुरकीरत मान यांच्यावर आहे.
अष्टपैलूंमध्ये वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे, क्रिस मॉरिस, मोईन अली, पवन नेगी, शिवम दुबे आहेत. गोलंदाजीत उमेश यादव, युझवेद्रं चहल, पवन नेगी, मोहंमद सिराज, नवदीप सेनी, इसुरु उडाना, मोईन अली आहेत.
राजस्थान संघाच्या फलंदाजीची मदार संजू सॅमसन, जोस बटलर, स्टीव्ह स्मीथ, रॉबिन उथप्पा, यशस्वी जयस्वाल, रियन प्राग, अनुज रावत, आहेत. अष्टपैलूंमध्ये महिपाल लोणार , श्रेयस गोपाल , आहेत गोलंदाजीत श्रेयस गोपाल, राहुल तेवतीया, जयदेव उनाडकट, अंकित राजपूत, अँड्रू टाय, ओशन थॉमस आहेत.
सलिल परांजपे, नाशिक