Saturday, May 4, 2024
Homeनगरसोशल मीडियावरील मैत्रीतून 14 लाखांची फसवणूक

सोशल मीडियावरील मैत्रीतून 14 लाखांची फसवणूक

अहमदनगर|Ahmedagar

शहरातील एका हॉटेल व्यवसायिकाला हर्बल प्रॉडक्ट खरेदीच्या बहाण्याने काही नायजेरीयन व्यक्तींनी 14 लाख 17 हजार 500 रूपयाला गंडा

- Advertisement -

घातल्याची बाब उघडकीस आली आहे. हा प्रकार 13 जुलै 2020 ते 2 नोव्हेंबर 2020 या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी गुरूवारी नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक झालेल्या हॉटेल व्यवसायिकाच्या फिर्यादीवरून गुन्हा झाला आहे.

काही दिवसापूर्वीच शहरातील एका उच्चशिक्षित व्यक्तीला 70 लाखाला गंडा घातल्याची बाब उघडकीस आली होती. याप्रकरणी सायबर पोलिसांनी एका नायजेरीयन व्यक्तीला अटक केली होती.

नगर शहरातील एका हॉटेल व्यवसायिकाची सोशल मीडियावर काही व्यक्तीसोबत मैत्री झाली. भारतातील हर्बल प्रोडॉक्ट कंपनीकडून आर्युवेदिक कच्चा माल खरेदी करण्याचा बहाणा या व्यक्तीने केला. विविध बँकेचे पाच खात्यांची खोटी ओळख त्या व्यक्तींनी हॉटेल व्यवसायिकाला सांगितली. व्यवसायिकाचा विश्‍वास बसल्याचे पाहून खरेदी प्रक्रिया सुरू केल्याचे भासवत विविध कारणांसाठी पैसे उकळण्यास सुरवात केली. बनावट ईमेल आकाऊंटवरून बनावट कागदपत्रे पाठवून आरोपी विश्‍वास संपादन करीत राहिले. विविध कारणांसाठी त्याने व्यवसायिकाकडून 14 लाख 17 हजार 500 रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे व्यवसायिकाच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी नगर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे. नगर सायबर पोलिसांनी तांत्रिक पातळीवर तपास सुरू केला असून बँक खात्याबाबत माहिती घेतली जात आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक साळवे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या