Friday, October 23, 2026
Homeक्राईमपोलिसाचा खून करण्यासाठी ५० लाखांची सुपारी! कंपनी सीईओसह चौघांवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल

पोलिसाचा खून करण्यासाठी ५० लाखांची सुपारी! कंपनी सीईओसह चौघांवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी
आंतरजातीय विवाह केल्याचा राग आणि पूर्ववैमनस्यातून पो लीस मुख्यालयातील एका पोलीस शिपायाला जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्यासाठी लाखांची सुपारी दिल्याचा एक अत्यंत गंभीर व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात एका कंपनीच्या सीइओसह युवतीच्या भावासह चौघा संशयितांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मानागो बिंदा दलाई (रा. चेहडी पंपिंग रोड, नाशिकरोड), कपिल निगळ, रोशन शिंदे आणि राहुल लभडे (तिघे रा. सातपूर) अशी गुन्हे दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलीस शिपाई अविनाश वसंत निरभवणे (वय ३०, रा. संदीपनगर, सा-तपूर कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, निरभवणे यांनी जुलै २०२५ मध्ये आंतरजातीय विवाह केला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच त्यांची पत्नी घर सोडून निघून गेली. पत्नीचा शोध घेत असताना ती संबंधित कंपनीचे सीइओ मानागो बिंदा दलाई यांच्या घरी आढळली. यावेळी दलाई यांनी शिपाई निरभवणे यांना जातीवाचक शिवीगाळ करत घरातून हुसकावून लावले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. १८ ऑगस्ट २०२५ रोजी संशयित कपिल निगळ व रोशन शिंदे यांनी फिर्यादी निरभवणे यांना त्र्यंबक रोडवरील कृषी केंद्राजवळ बोलावून घेतले. तू आरक्षणावर पोलीस झालास, आमच्यासमोर तुझी लायकी नाही, असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. तसेच त्यांच्या अंगावर थुकून त्यांचा अपमान करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

- Advertisement -

भारत-चीन LAC वर तणाव; ; चिनी सैन्याकडून कुरघोड्या सुरुच, भारतीय जवानांचं जशास तसे उत्तर, ITBP DG यांचा खुलासा

दरम्यान, आंतरजातीय विवाहाचे पुरावे जाळून टाकण्यास नकार दिल्याने संशयितांनी कट रचून निरभवणे यांच्याविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल घडवून आणल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या खोट्या गुन्ह्यामुळे निरभवणे यांना तब्बल ४० दिवस कारागृहात काढावे लागले आणि पोलिस खात्यातून निलंबनाची कारवाईलाही सामोरे जावे लागले.

५० लाखांची सुपारी आणि चाकूचा धाक
फिर्यादी निरभवणे हे कारागृहात असताना, कंपनीचा सीइओ मानागो बिंदा दलाई याने त्यांना संपवण्यासाठी मारेकऱ्यांना तब्बल ५० लाखांची सुपारी आणि शस्त्र खरेदीसाठी पैसे पुरवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, निरभवणे हे जामिनावर बाहेर आल्यानंतर १७ जुलै २०२६ रोजी सातपूर कॉलनी परिसरात दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. दलाईचा नाद सोड, नाहीतर जीवाने जाशील, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या सर्व प्रकारानंतर पीडित पोलिस शिपायाच्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अंबड विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन बारी करीत आहेत.

ताज्या बातम्या

राज

मनोज जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीप प्रकरणावर राज ठाकरे यांचं मोठं...

0
मुंबई | Mumbaiमराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...