Monday, June 24, 2024
Homeदेश विदेशसरसंघचालक भागवत आणि योगी यांच्यात ३० मिनीटं बंद दाराआड चर्चा?

सरसंघचालक भागवत आणि योगी यांच्यात ३० मिनीटं बंद दाराआड चर्चा?

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून त्यांनी शनिवारी योगी आदित्यनाथ यांच्याशी बंद दाराआड चर्चा केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. दोघांमध्ये किमान ३० मिनीटे बैठक झाल्याची माहिती मिळत आहे. एकीकडे लोकसभेच्या निकालानंतर संघाच्या मुखपत्रातून भाजपावर टीका होत असताना ही बैठक झाल्याने अनेकांच्या भुवयादेखील उंचावल्या आहेत.

- Advertisement -

एका वृत्तपत्राच्या सुत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) लोकसभा निवडणुकीत २०२४ च्या खराब कामगिरीनंतर अनेक चर्चा सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दोघांमध्ये ही आढावा बैठक झाल्याचे वृत्त आहे. दोघांमध्ये दोनदा बैठका झाल्या. आदित्यनाथ यांनी शनिवारी दुपारी कॅम्पियरगंज भागातील एका शाळेत भागवत यांची पहिल्यांदा भेट घेतली. संघाच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोहन भागवत येथे आले होते. सीएम योगी आदित्यनाथ आणि मोहन भागवत यांच्यातील दुसरी बैठक पक्कीबाग परिसरातील सरस्वती शिशु मंदिरात रात्री साडेआठ वाजता झाली.

अयोध्येमध्ये राम मंदिर बांधल्याच्या आधारे भाजपाला अवघ्या देशभरात चांगेल निकाल अपेक्षित होते, परंतू अयोध्या लोकसभेसह उत्तर प्रदेशमध्ये धक्कादायक निकाल लागले आहे. एवढेच नाही तर अयोध्या राम मंदिर ज्या फैजाबादमध्ये येते त्या जागेवरही भाजपाला विजय मिळवता आला नाही.

दरम्यान, या भेटीकडे आता अनेक अर्थांनी बघितले जात आहे. तसेच दोन्ही नेत्यांमध्ये उत्तर प्रदेशच्या निकालाबाबत चर्चा झाल्याचं बोलले जात आहे. खरे तर सरसंघचालक मोहन भागवत हे बुधवारपासून गोरखपूरमध्ये आहेत.अखेर शनिवारी या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली असल्याची चर्चा सुरु आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या