नागपूर | Nagpur
आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १०० व्या वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्ताने नागपूरमधील मुख्यालयात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सकाळी संघ स्वयंसेवकांचे पथसंचलन व मान्यवरांची भाषणे झाली. शेवटी सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषणातून त्यांची भूमिका मांडली. नागपूर येथे विजयादशमी उत्सवात त्यांनी अनेक मुद्यांवर सरकारचे कान धरले. ओटीटीवर बीभत्सपणा वाढला आहे, ओटीटीवर कंटेट हा सर्वासाठी खुला आहे, याचे काही चांगले वाईट परिणाम समाजात वारंवार दिसून येतात. विजय दशमीच्या मुहूर्तावर संघ मुख्यालय नागपूर येथून आपल्या भाषणावेळी संघ प्रमुख मोहन भागवत यांनी अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले, ज्यामध्ये ओटीटीचाही समावेश होता.
काय म्हणाले मोहन भागवत?
माध्यमांनी जबाबदारीने वर्तन ठेवण्याचा सल्ला यावेळी सरसंघचालक मोहन भागवतांनी दिला. “समाजाची मानसिकता तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माध्यमांना याची चिंता करायला हवी की आपल्या कृतीतून समाजाची धारणा, भद्रता, मांगल्य कायम राखणाऱ्या मूल्यांचे पोषण व्हायला हवे. किमान या गोष्टींना धक्का लागेल असे तरी काम करायला नको”, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील मजकुरावर भाष्य केले.
“ज्या प्रकारच्या गोष्टी समोर येत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म्स वगैरैंवर ज्या गोष्टी दाखवल्या जातात, ते सांगणेही अभद्र ठरेल इतके बीभत्स असते. त्यामुळेच मी म्हणतो की या सगळ्यावर कायद्यानेही नियंत्रण ठेवण्याची खूप गरज आहे. संस्कार भ्रष्ट होण्यामागचे एक मोठे कारण तेही आहे”. नवीन शिक्षानीती मध्ये संस्कार आले पाहिजे. शिक्षण घेताना त्याचा मूर्तिमंत उदाहरण शिक्षक, प्राध्यापक असायला पाहिजे. OTT प्लॅट फॉर्म वर जे दाखविले जाते ते सांगितले तरी अभद्रता होईल यावर नियंत्रण आले पाहिजे. चालताना नियमांचे पालन केले पाहिजे.
संघ प्रमुखांनी OTT सारख्या प्लॅटफॉर्मला लोकांमधील मूल्ये नष्ट होण्याचे प्रमुख कारण सांगितले. ते यावर बोलताना म्हणाले, हे देखील एक मोठे कारण आहे ज्यामुळे आज मूल्यांचा ऱ्हास होत आहे. जेव्हा ही मूल्ये जीवनात येतात, तेव्हा त्याचा दुसरा पैलू सामाजिक आणि नागरी जीवनाचा असतो. मूल्यांच्या ऱ्हासाचा प्रश्न आहे, ही मूल्ये तीन ठिकाणी आढळतात. संस्कारांची व्यवस्था पुनर्संचयित आणि मजबूत करावी लागेल.पोटाची खळगी भरण्यासाठी शिक्षण देण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठीही शिक्षण यंत्रणा काम करते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा