Friday, May 31, 2024
Homeदेश विदेशRSS Dasara Melava: दसरा मेळाव्यातील सरसंघचालक भागवतांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

RSS Dasara Melava: दसरा मेळाव्यातील सरसंघचालक भागवतांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

नागपूर | Nagpur

आज नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा (RSS Dasara Melava) मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात बोलताना आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत (RSS SarsanghaChalak Mohan Bhagwat) यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. लोकसभा निवडणुकीत भावना भडकावून मते मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार, मात्र समाजाने अशा गोष्टींपासून दूर राहावे असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. विकासाचे मुद्दे लक्षात घेऊनच मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. मोहन भागवतांनी केलेल्या भाषणात अप्रत्यक्षपणे इंडिया आघाडीवर हल्ला केला आहे. मोहन भागवतांच्या भाषणातील दहा महत्वाचे मुद्दे.

- Advertisement -

यावेळी बोलताना त्यांनी G20 परिषदेच्या आयोजनाचं देखील कौतुक केले. भारताने G20 परिषदेमध्ये आलेल्या पाहुण्यांचे ज्या पद्धतीने आदरातिथ्य केले त्याचे जगभरात कौतुक झाले. वसुधैव कुटुंबकमचा अनुभव जगाने घेतला असे यावेळी सरसंघचालकांनी म्हटले आहे.

सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन आणणारा दसरा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नागरिकांना शुभेच्छा

यंदा प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या देशाच्या खेळाडूंनी २८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४१ कांस्य अशी एकूण १०७ पदकांची कमाई करीत प्रथमच १०० हून अधिक पदके जिंकून आपल्या सर्वांनाच प्रोत्साहित, आनंदित केले आहे. त्यासाठी आम्ही सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. यासोबतच, तंत्रज्ञानाचा वापर गरीबांच्या कल्याणासठी केला जात आहे. आम्हाला आनंद आहे, की आम्ही पुढे जात आहोत. फक्त भौतिक दृष्टीनेच नाही तर देशाचा गौरवपण वाढत आहे. पुढे जात असताना आपल्याला जगाला नवीन रस्ता दाखवायचा आहे. जगाच्या मागे धावायचे नाही असे भागवत यांनी म्हटले आहे.

तर, यावेळी ते मणिपूर हिंसाचारावर देखील बोलले आहेत. मणिपूर आता शांत होतोय. जवळपास दशकभर शांतता प्रस्थापित असलेल्या मणिपूरमध्ये हा परस्पर कलह अचानक कसा उफाळून आला? हिंसाचार करणाऱ्यांमध्ये सीमेपलीकडील अतिरेकीही होते का?आपल्या अस्तित्वाच्या भवितव्याबाबत धास्तावलेल्या मणिपुरी मैतेई समाज आणि कुकी समाजाच्या या परस्पर संघर्षाला जातीय वा धार्मिक स्वरूप देण्याचा हा प्रयत्न का आणि कोणाकडून करण्यात आला? वर्षानुवर्षे सर्वांची समान दृष्टीने विनाकारण सेवा करत असलेल्या संघासारख्या संघटनेला खेचण्याचा प्रयत्न का केला जात आहे.

गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला, दोघांचा मृत्यू, VIDEO आला समोर

यासोबतच, सरकार मजबूत आहे, तत्पर आहे स्वतः गृहमंत्री तीन दिवस तिथे जाऊन आले. पण हा आपसातातील वाद झाला कसा हा प्रश्न आहे.गेल्या ९ वर्षांपासून सुरू असलेली शांतता कायम ठेवण्याचे काम राज्य सरकार करत असतानाही हा हिंसाचार का सुरू झाला आणि कोणी सुरु केला ?

देशात आपल्या राजकीय स्वार्थासाठी प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्याच्या हेतूने अशा अनिष्ट शक्तींशी युती करण्याचा अविवेक केला जात आहे. समाज आधीच आत्मविस्मृत होऊन विविध प्रकारच्या भेदांनी ग्रासलेला आणि स्वार्थ, मत्सर अन् द्वेषाच्या जीवघेण्या स्पर्धेत अडकलेला आहे. त्यामुळेच या राक्षसी शक्तींना समाज किंवा राष्ट्र तोडू पाहणाऱ्या अंतर्गत किंवा बाह्य शक्तींचाही सहज पाठिंबा मिळतो.

भीषण अपघात! दोन रेल्वे एकमेकांना धडकल्या, २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी

अयोध्येत २२ जानेवारीला रामलल्ला मंदिरात प्रवेश करणार आहेत. त्यावेळी इतक्या लोकांना तिथे उपस्थित राहाता येणे शक्य नाही. त्यामुळे आपल्या क्षेत्रातच राहून छोट्या-छोट्या कार्यक्रमांचे आयोजन करून धर्मिक वातावरण निर्माण करता येईल असे भागवत यांनी म्हटले आहे.

‘चांद्रयाना’च्या निमित्ताने उदयोन्मुख भारताच्या शक्ती, बुद्धी आणि कौशल्याची झलकही जगाने पाहिली आहे. इतिहासात प्रथमच भारताचे विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवले. सर्व भारतीयांचा अभिमान आणि आत्मविश्वास वाढवणारे हे काम ज्या शास्त्रज्ञांनी पूर्ण केले त्यांचे आणि त्यांना बळ देणाऱ्या नेतृत्वाचे, देशभर सर्वत्र कौतुक होत आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या