Tuesday, March 25, 2025
Homeमुख्य बातम्याBhaiyyaji Joshi : "घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत येणाऱ्याला मराठी बोलता आलंच पाहिजे...

Bhaiyyaji Joshi : “घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत येणाऱ्याला मराठी बोलता आलंच पाहिजे असं नाही”; भैय्याजी जोशींचे वक्तव्य  

भैय्याजी जोशींचे विधान औरंगजेबापेक्षाही भयंकर कृत्य - संजय राऊत

मुंबई | Mumbai

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांनी मुंबईतील विद्याविहार या ठिकाणी विविधतेमधील एकता यावर बोलतांना ‘मुंबईतील (Mumbai) प्रत्येकाला मराठी भाषा बोलता आलं पाहिजे असं नाही’ असं वक्तव्य केले आहे. त्यामुळे विरोधकांकडून जोशी यांच्यावर टीका केली जात आहे.

- Advertisement -

भैयाजी जोशी म्हणाले की,”मुंबईची एक भाषा नाही, मुंबईत अनेक भाषा आहेत. प्रत्येक भागाची भाषा वेगवेगळी असली तरी घाटकोपर परिसरातील भाषा गुजराती आहे. मुंबईत येणाऱ्याला मराठी बोलता (Marathi Language) आलेच पाहिजे असं काही नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भैय्याजी जोशी यांच्या विधानाचे राजकीय पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे. तसेच या कार्यक्रमाला मंत्री मंगल प्रभात लोढा हे देखील उपस्थित होते. त्यांच्या समक्ष जोशी यांनी हे वक्तव्य केल्याने राजकीय (Political) वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

भैय्याजी जोशींचे विधान औरंगजेबापेक्षाही भयंकर कृत्य – संजय राऊत

भैय्याजी जोशी यांनी केलेल्या विधानानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) माध्यमांशी बोलतांना म्हणाले की,”मराठी ही आमची राज्यभाषा आहे. मुंबईची भाषा मराठी नाही हे भैय्याजी जोशी यांनी राजद्रोहाचे विधान केले आहे. कालपासून दोन विषय असवस्थ करणारे आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी या विधानाचा आज निषेध करावा. हे औरंगजेबापेक्षाही भयानक कृत्य आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या विधानाचा धिक्कार करावा. भैय्याजी जोशी यांनी मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अपमान केला आहे. लाचार आणि देशद्रोही सरकार असल्याने यावर बोलणार नाही”, असे त्यांनी म्हटले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...