नाशिक । Nashik (प्रतिनिधी)
आरटीईच्या पहिल्या सोडतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यानंतर आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी देण्यात आली आहे. अशा पालकांना 8 ऑक्टोबरपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश घेता येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे. ही प्रक्रिया जाहीर केल्याने पालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
या प्रवेशप्रक्रियेत जवळपास 1 लाख 15 हजार 460 जागांसाठी 17 मार्चला पहिल्या सोडतीत एक लाख 926 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. अनलॉक सुरू झाल्यानंतर या प्रक्रियेतील प्रवेशाला गती मिळाली. प्रवेशाच्या अंतिम मुदतीपर्यत पहिल्या सोडतीत निवड झालेल्यांपैकी 68 हजार 201 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.
आता या प्रवेश प्रक्रियेतंर्गत 47 हजार 271 जागा रिक्त असून या रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. पालकांना ‘एसएमएस’द्वारे प्रवेशाची तारीख कळविली जाणार आहे.
तरी पालकांनी आरटीई पोर्टलवर विद्यार्थ्यांचा अर्ज क्रमांक टाकून शाळा प्रवेशाची तारीख पाहावी. अधिक माहितीसाठी पालकांनी ttps://student.maharashtra.gov.in/admšportal/Users/rteindex या पोर्टलला भेट द्यावी.
पालकांसाठी सूचना
* शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांनी गर्दी करू नये.
* प्रवेशा दरम्यान बालकांना शाळेत घेऊन जाऊ नये.
* प्रवेशासाठी लागणार्या कागदपत्रांच्या मूळ प्रती तसेच छायांकित प्रति सोबत घेऊन जावे.
* शाळांमध्ये शिल्लक राहिलेल्या रिक्त जागानुसार पालकांना डचड द्वारे प्रवेशाचा दिनांक कळविला जाईल परंतू पालकांनी फक्त मेसेज (SMS) वर अवलंबून राहू नये.
* आर.टी.ई. पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहावा .पोर्टलवरील हमी पत्र आणि अर्जाची स्थिती या ींरल वर लश्रळलज्ञ करून हमी पत्र आणि अलॉटमेंट लेटर (allotment letter) यांची प्रिंट काढून शाळेत घेऊन जाणे