Friday, September 20, 2024
Homeनगरआरटीईनुसार विद्यार्थ्यांची प्रतिक्षा यादी जाहीर

आरटीईनुसार विद्यार्थ्यांची प्रतिक्षा यादी जाहीर

26 ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्याची मुदत

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

- Advertisement -

शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण कायद्याअंतर्गत प्रवेश दिले जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठीची प्रवेशाची पहिली प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. त्याअंतर्गत 23 हजार 850 विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली आहे. आत्तापर्यंत त्यातील 110 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. शिक्षण विभागाने प्रवेशासाठी येत्या 26 ऑगस्टपर्यंत संबंधित विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन केले आहे.

शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायदा अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. त्यानुसार प्रवेशासाठी अर्ज केलेल्या 2 लाख 42 हजार 516 विद्यार्थ्यांपैकी प्रवेशासाठी निवड झालेल्या नियमत विद्यार्थ्यांमधून 61 हजार 191 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने त्या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले होते. त्याअंतर्गत पहिल्या प्रतीक्षा यादीमधून औरंगाबाद जिल्ह्यातील 1 हजार 329, नागपूर जिल्ह्यातील 2 हजार 210, नाशिक जिल्ह्यातील 1 हजार 233, पुणे जिल्ह्यातील 4 हजार 634, ठाणे जिल्ह्यातील 1 हजार 995 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

पहिल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात आहेत. सध्या मर्यादित विद्यार्थ्यांची निवड केली असली तरी पुढील काळात आणखी तीन फेर्‍यांच्या माध्यमातून रिक्त जागांवर प्रवेश दिले जाऊ शकतात असे समजते. दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शिक्षक कायद्याअंतर्गत देण्यात आलेली प्रवेशाची प्रक्रिया 100 टक्के पूर्ण झाल्याचेही समजते. त्यामुळे उर्वरित जिल्ह्यांतील रिक्त जागांवर प्रवेशाची प्रक्रिया येत्या काही कालावधीत पूर्ण होणार आहे. दरम्यान प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी 26 ऑगस्टपर्यंत प्रवेश न घेतल्यास त्यांचे प्रवेश रद्द होऊ शकतील असे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या