Thursday, November 21, 2024
Homeदेश विदेशJammu Kashmir Assembly: कलम ३७० वरुन जम्मू-काश्मीर विधानसभेत तुफान राडा; दोन्ही गटातील...

Jammu Kashmir Assembly: कलम ३७० वरुन जम्मू-काश्मीर विधानसभेत तुफान राडा; दोन्ही गटातील आमदार एकमेकांना भिडले

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू काश्मीर विधानसभेत गुरुवारी (7 नोव्हेंबर 2024) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आर्टिकल ३७० वरून जबरदस्त गदारोळ बघायला मिळाला. एवढेच नाही, तर परिस्थिती हाणामारीपर्यंत पोहोचली. सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. कलम ३७० वरून धुमश्चक्री उडाली. हे कलम मागे घेण्यासाठी वाद उफाळून आला आहे. गुरूवारी दोन्ही गटातील आमदार एकमेकांना भिडले.

नेमके काय घडले?
लांगेटचे अवामी इत्तेहाद पार्टीचे आमदार शेख खुर्शीद हे सभागृहात एक पोस्टर घेऊन पोहोचले होते. त्यांनी हे पोस्टर दाखवले. या पोस्टरवर आर्टिकल ३७० बहाल करण्याची मागणी करण्यात आली होती. हे पोस्टर पाहून भाजप नेते तथा विधानसभेतील विरोधीपक्ष नेते सुनील शर्मा यांनी विरोध केला. भाजपचे आमदार भडकले आणि त्यांनी शेख खुर्शीद यांच्या हातातून पोस्टर हिसकावून घेतले. यानंतर हाणामारीही झाली. भाजप आमदारांनी हे पोस्टर फाडून टाकले. यानंतर भाजप आमदारांनी जबरदस्त गदारोळ केला.

- Advertisement -

या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज २० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले होते. पण दोन्ही बाजुचे आमदारांची आक्रमकता पाहता आज विधानसभेच्या कामकाजाला फटका बसण्याची शक्यता आहे. सकाळीच विधानसभेत मोठा हंगामा झाला. त्यानंतर दोन्ही गटाचे आमदार आमने-सामने आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. घोषणाबाजीने सभागृह दणाणून गेले.

विधानसभा अधिवेशनाच्‍या पहिल्‍याच दिवशी दि. ४ नोव्हेंबरला राज्‍याला विशेष दर्जा बहाल करणारे कलम ३७० पुनर्संचयित करण्‍याचा प्रस्‍ताव ‘पीडीपी’च्‍या आमदार वाहिद पारा यांनी सभागृहात मांडला. या प्रस्‍तावाला भाजपच्‍या आमदारांनी तीव्र निषेध केला. यानंतर विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा विशेष राज्याचा दर्जा द्यावा, अशी आमदार वाहिद पारा यांनी मागणी केली. विधानसभेत या प्रस्तावावरून भाजप आणि पीडीपी आमदारांमध्ये जोरदार वादावादी झाली होती.

हे ही वाचा: Sadabhau Khot: तर मी माझे शब्द मागे घेतो…; शरद पवारांबद्दल वक्तव्यावर सदाभाऊ खोतांची दिलगीरी

कलम ३७० आता इतिहास जमा झाल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते रविंद्र रैना म्हणाले. ओमर अब्दुल्ला सरकार पाकिस्तानच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप यावेळी भाजपाने केला. कलम ३७० ने जम्मू आणि काश्मीरमधे दहशतवाद, अलिप्ततावाद आणि पाकिस्तानी विचारांना खतपाणी घातल्याचा आरोप रैना यांनी केला. हे कलम हटवण्याचा प्रस्ताव असंवैधानिक असल्याचे ते म्हणाले. नॅशनल काँन्फरन्स आणि काँग्रेस हे जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. यातून, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती पुन्हा बिघडवायची आहे, हेच दिसून येते. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने भारतमातेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.”

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या