मुंबई | Mumbai
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. सरकार कोसळणार का? अशी चर्चा जोर धरत आहे. एकनाथ शिंदे गटात ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे….
- Advertisement -
थोड्याच वेळापूर्वी एकनाथ शिंदे हे गुवाहाटीमधून मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी त्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. मी जिथे आहे तिथेच अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
शेतकरी वाऱ्यावर अन् राज्याचे कृषीमंत्री चिंतन शिबिरात; संजय राऊतांची दादा भूसेंवर टीका
ते आजच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतील अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र आता एकनाथ शिंदे हे गुवाहटीतच असल्याचे त्यांनी जाहीर केल्याने आता ही भेट कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.