Tuesday, January 6, 2026
Homeदेश विदेशRatan Tata : "माझी प्रकृती उत्तम, अफवांवर विश्वास ठेवू नका"; रतन टाटांनी...

Ratan Tata : “माझी प्रकृती उत्तम, अफवांवर विश्वास ठेवू नका”; रतन टाटांनी पोस्ट करत दिली माहिती

मुंबई । Mumbai

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Industrialist Ratan Tata) यांची प्रकृती गंभीर असल्याची चर्चा गेल्या काही तासांपासून सुरू आहे. त्यांचा ब्रीच कँडी रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आल्याच्या बातम्याही व्हायरल झाल्या आहेत.

- Advertisement -

दरम्यान याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. रतन टाटा यांची प्रकृती स्थिर असून नियमित तपासणी करण्यासाठी ते रुग्णालयात गेल्याची माहिती रतन टाटा यांच्या सोशल मीडिया पोस्टवरुन शेअर करण्यात आली आहे.

YouTube video player

“माझ्या आरोग्याबाबत पसरत असलेल्या अफवांची मला जाणीव आहे. पण ते सर्व दावे निराधार आहेत. याची मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो. वय आणि संबंधित वैद्यकीय परिस्थितीमुळे वैद्यकीय तपासणी करत आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. माझी प्रकृती सध्या ठणठणीत आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये”, असं रतन टाटा एक्सवरील पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

सोशल मीडियावर पसरलेल्या बातमीनुसार, टाटा आंना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांना रक्तदाबाचा त्रास होत असल्याचं वृत्त होतं. मात्र, स्वतः रतन टाटा यांनी त्यांच्या एक्स हँडलवर पोस्ट करून हे चुकीचं असल्याचं जाहीर केलं आहे.

ताज्या बातम्या

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंनी अजितदादांना करून दिली 70 हजार कोटींच्या घोटाळ्याची...

0
मुंबई । Mumbai राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये सध्या सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र समोर येत असून,...