Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! खेवलकरच्या मोबाईलमध्ये २५२ व्हिडीओ, १४९७ अश्लील फोटो; रुपाली चाकणकरांची खळबळजनक...

मोठी बातमी! खेवलकरच्या मोबाईलमध्ये २५२ व्हिडीओ, १४९७ अश्लील फोटो; रुपाली चाकणकरांची खळबळजनक माहिती

पुणे | Pune
पुणे शहरातील एका फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याचा आरोप करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचा पती प्रांजल खेवलकर यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. रेव्ह पार्टीवर पोलिसांना धाड टाकली असता तिथे दोन महिला देखील आढळल्या होत्या. आता याच मुद्द्यावरुन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणी सखोल तपास केला जातोय. यासाठी प्रांजल खेवलकर यांचा मोबाईलदेखील पोलिसांकडून तपासण्यात आला आहे. त्यामध्ये आक्षेपार्ह व्हिडीओ आढळल्याचा आरोप रुपाली चाकणकर यांनी केला आहे. रुपाली चाकणकर यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.

राज्य महिला आयोगाच्या वतीने पुणे पोलिसांना सूचना देण्यात आल्या होत्या, त्यानुसार सानवी संस्थेचा अहवाल आज प्राप्त झाला असून हा अहवाल भीषण आणि भयावह असल्याचे चाकणकर म्हणाल्या. पुणे येथील अमली पदार्थ पार्टीत अटकेत असलेले प्रांजल खेवलकर याच्या तपासात पोलिसांना धक्कादायक गोष्टी हाताला लागल्या आहेत. प्रांजल खेवलकर याच्या फोनमध्ये एक हिडन फोल्डर आहे. त्या फोल्डरमध्ये मुलींचे १७७९ अश्लील व्हिडीओ आणि फोटो आहेत. मुलींसोबतचे अश्लील आणि अतिशय अश्लाघ्य फोटो आहेत, जे सांगतानाही मला संकोच वाटत आहे. खेवलकर यांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीचे देखील अश्लील फोटो त्याच्या मोबाईलमध्ये आहे. अशी सनसनाटी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.

- Advertisement -

रुपाली चाकणकरांनी पत्र वाचून दाखवले
“रुपाली चाकणकर यांनी यावेळी पोलिसांचे पत्र वाचून दाखवले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रांजल खेवलकर, निखिल पोपटानी, समीर फकीर, मोहम्मद सय्यद, सचिन भोंबे, श्रीपाद मोहम्मद यादव यांच्यासोबत असलेल्या दोन महिला यांना पुणे येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेले ४२ लाख ५३ हजार ४०० रुपये किंमतीचे कोकेन, गांजा, १० मोबाईल, २ चारचाकी वाहने, हुक्का पॉट, दारुच्या बाटल्या अशा इतर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.”

“यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या पुणे येथील घरातून जो मोबाईल जप्त केला होता, त्यामध्ये तांत्रिक विश्लेषणाने तपासणी केली असता, या मोबाईलमधील हिडन फोल्डरमध्ये महिलांसोबत असलेले चॅटचे स्क्रिनशॉट, पार्टीचे फोटो, व्हिडीओ, तसेच महिलांचे नग्र आणि अर्धनग्रन फोटो तसेच काही अश्लील कृत्याचे व्हिडीओ हाती लागले. या मोबाईलमध्ये जे व्हाट्सअॅप चॅट करण्यात आले त्यामध्ये एकूण ७ मुली आढळून आल्या. या मुलींची नावे आरुष या नावाने सेव्ह केलेली होती. म्हणजेच आरुष या नावाची व्यक्ती मुलींची मानवी तस्करी करत होती. या चॅटवरुन आरुष याने मुलींना पार्टीकरता लोणावळा आणि पुणे येथे बोलावल्याची माहिती समोर आली.”

चित्रपटात काम देतो म्हणून मुलींना बोलावले
लोणावळा येथे सगळ्यांना बोलण्यात आले होत, प्रांजल यांनी मुलींना पिच्चरमध्ये काम देतो म्हणून बोलवले आहे. गोवा, लोणावळा, साकिनाका, जळगाव या ठिकाणी बोलवल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. या मुलींसोबत लैगिक अत्याचार झाल्याचे समोर आले असून अनैतिक मानवी तस्करीचे रॅकेट असण्याची शक्यताही रुपाली चाकणकर यांनी वर्तवली आहे.

फोनमध्ये २५२ व्हिडिओ आणि १४९७ अश्लील फोटो
खेवलकर यांच्या हिडन फोल्डरमधून महिलांचे नग्न अर्धनग्न फोटो हाती लागले आहेत. मोबाईल फोल्डरमध्ये २५२ व्हिडिओ आणि १४९७ फोटो आहेत. यात मुलींचे नग्न फोटो आहेत. मुलींना विवस्त्र करून, नशा देऊन लैंगिक अत्याचार केल्याचे दिसते. या व्हिडीओच्या माध्यमातून मुलींना ब्लॅकमेल करण्यात आले. मोलकरणीचे देखील अश्लील फोटो मोबाईलमध्ये आहेत. केवळ मुंबई, पुणे, ठाणे येथूनच नाही तर परराज्यातील मुलींना बोलवून अत्याचार केले गेले, असे तपासात समोर आल्याचे चाकणकर यांनी सांगितले.

देशातले सगळ्यात मोठे मानवी तस्करीचे रॅकेट?
याप्रकरणी, महिलांना कसे आणले, त्यांचा कसा वापर केला याची तपासणी होण गरजेचे आहे. मोबाईल आणि फोन कॉलची चौकशी करण्यात यावी. एका रेव्ह पार्टीसंदर्भात हे प्रकरण असले तरी मानवी तस्करीचा प्रकार आहे. पुण्यात हा प्रकार असल्याने हे वाईट आहे. या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, केवळ पार्टीच्या नावाखाली ही तस्करी सुरू आहे. देशातले सगळ्यात मोठे मानवी तस्करीचे हे रॅकेट असू शकते, असेही चाकणकर यांनी म्हटले.

या प्रकरणात ३५० पेक्षा जास्त मुलींचा वापर केला आहे असे अहवालातून समोर आले आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. हे फार मोठे रॅकेट आहे, हे उघडकीस येईल, अनेक व्हिडिओमध्ये खेवलकर स्वतः आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या मुलींचा वापर केला गेला आहे.पीडित मुलींनी समोर येऊन तक्रार द्यावी, काही मुलींनी तक्रार दिली असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...