पुणे | प्रतिनिधी | Pune
करोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मागील चार ते पाच महिन्यांपासून सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. आता राज्यातील मंदिरे खुली करावीत या मागणीसाठी भाजपकडून शनिवारी राज्यभरात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपसह अनेक धार्मिक संघटना आणि संस्थाही सहभागी झाल्या होत्या. राज्य सरकार मॉल, दारूची दुकाने उघडू शकतो तर मंदिरे उघडण्याला विरोध का? असा सवाल या आंदोलनातून सरकारला विचारण्यात आला होता. त्यावर चाकणकर यांनी हे ट्वीट केले आहे.
करोना महामारीचे संकट अखंड मानवजातीवर ओढवलेले असताना विरोधकांकडून राजकीय हित डोळ्यासमोर ठेऊन घंटानाद आंदोलन करण्यात आले. सत्तेची दारे बंद झाल्यानेच भाजप घंटानाद आंदोलन करत आहे, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटरद्वारे केली आहे.
मंदिर, मस्जिद, देव-देवता हा आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यावर कोणाची मक्तेदारी नाही. कोरोना महामारीचे संकट अखंड मानवजातीवर ओढवलेले असताना विरोधकांकडून राजकीय हित डोळ्यासमोर ठेऊन घंटानाद आंदोलन करण्यात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.