Sunday, June 23, 2024
Homeमुख्य बातम्याRupali Chakankar : रुपाली चाकणकरांना आमदारकीचे वेध, ‘या’ मतदार संघातून निवडणूक लढवणार?

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांना आमदारकीचे वेध, ‘या’ मतदार संघातून निवडणूक लढवणार?

पुणे | प्रतिनिधी

- Advertisement -

शरद पवार यांनी सर्व सामान्य कुटुंबातील एका महिलेला राज्य महिला आयोगावर काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल पवार साहेबांची मी आभारी आहे. मी खडकवासला मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढविण्यास इच्छूक असून, अगोदरच पक्षाकडे मी उमेदवारी मागितली आहे, अशी प्रतिक्रिया महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सोमवारी दिली.

Accident News : दोन बसेसचा भीषण अपघात! १२ जण ठार, ८ जखमी

पुणे महानगरपालिकेतील हिरकणी कक्षाला चाकणकर यांनी आज भेट दिली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, मी खडकवासला मतदारसंघात आधीच उमेदवारी मागितली आहे. या मतदारसंघातील काम मी आधीपासूनच सुरु केलं आहे. मी पक्षात अनेक पदावर काम केलं आहे. तो अनुभव पाहता उमेदवारी मिळावी, अशी इच्छा आहे. तुम्ही आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपमधून खडकवासला मतदारसंघाची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे, याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये अनेक पदावर काम केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातूनच मी उमेदवारी मागितली आहे. ज्या लोकांनी तुम्हाला सांगितलं की, मी दुसऱ्या पक्षातून इच्छूक आहे त्यांची आणि माझी एकदा मला भेट घालून द्या. या गोष्टी तुमच्याकडूनच मला समजतात, असे चाकणकर म्हणाल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या