Thursday, February 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRupali Chakankar : "साडेपाच तास रक्तस्त्राव आणि तनिषा भिसेंवर..."; रुपाली चाकणकरांनी सांगितला...

Rupali Chakankar : “साडेपाच तास रक्तस्त्राव आणि तनिषा भिसेंवर…”; रुपाली चाकणकरांनी सांगितला घटनाक्रम

पुणे | Pune

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने (Dinanath Mangeshkar Hospital) पैशांअभावी उपचारास नकार दिल्याने गर्भवतीचा मृत्यू (Death) झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाने चौकशीसाठी नेमलेल्या समितीने गर्भवतीच्या घरी जाऊन रविवारी तिच्या नातेवाइकांचे जबाब नोंदविले. दरम्यान, या प्रकरणी समितीने प्राथमिक अहवाल आरोग्य संचालकांकडे पाठविला असून, अंतिम अहवालाविषयी आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सविस्तर माहिती दिली.

- Advertisement -

यावेळी बोलतांना रूपाली चाकणकर म्हणाल्या की, “आज पुणे पोलीस (Pune Police) आयुक्तालयात आढावा बैठक पार (Pune News) पडली. बैठकीपूर्वी मी भिसे कुटुंबियांची घरी जावून भेट घेतली. कोणतीही व्यक्ती रूग्णालयात गेल्यानंतर ते वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी त्यांना सांगतात, जेणेकरून उपचार चांगला मिळावा. पेशंट १५ मार्चपूर्वी डॉ. घैसास यांना भेटलेले होते. त्यांना रूग्णाची मेडिकल हिस्टरी माहित होती. ही माहिती वैयक्तिक ठेवायची असते, परंतु घटना घडल्यानंतर रूग्णालयाच्या समितीने आपल्या बचावासाठी ही माहिती सर्वांसमोर मांडली. रूग्णालयाने मगरूरी केली, हलगर्जीपणा केला, यामुळे रूग्णालय दोषी आहे. साडेपाच तासांचा अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्याने रूग्णाचा मृत्यू झाला, असे त्यांनी सांगितले.

YouTube video player

पुढे त्या म्हणाल्या की, “राज्य महिला आयोगाला (State Women’s Commission) त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य महिलांनी हे पत्र दिले आहे. रूग्णाची वैयक्तिक माहिती अहवालात दिली, यासंदर्भात दीनानाथ मंगेशकर रूग्णालय प्रशासनाला समज दिली जाईल. एक तारखेला रूग्णालयात रुग्ण गेल्यानंतर नऊ वाजून एक मिनिटांची पेशंटची एन्ट्री आहे. त्यानंतर त्यांनी पेशंटच्या ऑपरेशनची तयारी केली स्टाफला सूचना दिल्या, परंतु रूग्णाला ऑपरेशनसाठी घेवून जाण्याअगोदर दहा लाखाची मागणी केली. ही गोष्ट पेशंटसमोरच घडत होती”, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले.

तसेच “संबंधित विभागाला अनेकांनी फोन केले. पण याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. तब्बल पाच तासांनी अडीच तासानंतर पेशंट बाहेर पडले. पण मंगेशकर रूग्णालयाने पेशंटवर उपचार केले नाही. यादरम्यान अतिरिक्त रक्तस्त्राव झाला. दुसऱ्या रूग्णालयात गेल्यानंतर पेशंटची डिलिव्हरी झाली. परंतु खचून गेल्यामुळे रूग्णाचा मृत्यू झाला. सूर्या रूग्णालयाकडून पेशंटवर चांगले उपचार झाले हे सर्व कुटुंबाच्या घरातील सदस्यांनी अर्जात मांडले आहे”,असेही चाकणकर म्हणाल्या.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पोलीस शिपाई पदांसाठी उच्चशिक्षित मैदानात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गाच्या 73 रिक्त पदांसाठी होणार्‍या भरती प्रक्रियेस 11 फेब्रुवारी पासून सुरूवात होत असून 14 फेब्रुवारीपर्यंत मैदानी...