Wednesday, September 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजखरात प्रकरणात ईडीकडून रुपाली चाकणकर यांची आठ तास चौकशी; म्हणाल्या 'माझा ……'

खरात प्रकरणात ईडीकडून रुपाली चाकणकर यांची आठ तास चौकशी; म्हणाल्या ‘माझा ……’

मुंबई |

महिला लैंगिक अत्याचार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी आर्थिक संबंध आहेत का, तसेच त्याच्या व्यवहारांमध्ये सहभाग होता का, या अनुषंगाने ईडीकडून माजी महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची चौकशी करण्यात आली. मुंबईतील वरळी येथील ईडी कार्यालयात गुरुवारी सकाळी त्या हजर झाल्या होत्या. जवळपास आठ तास त्यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

भोंदूबाबा अशोक खरातने दैवी शक्ती, काळी जादू आणि अध्यात्मिक प्रभावाचा धाक दाखवत अनेकांकडून पैशांची उकळपट्टी आणि खंडणी वसूल केल्याचे आरोप आहेत. तसेच, विविध बेनामी खात्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणातील आर्थिक उलाढाल तब्बल ७० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जात असून, त्याच पार्श्वभूमीवर ईडीने मनी लाँड्रिंगअंतर्गत स्वतंत्र तपास सुरू केला आहे.

याआधी एसआयटीकडूनही रुपाली चाकणकर यांची तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली होती. अशोक खरातशी असलेले संबंध आणि त्याच्याशी असलेली जवळीक याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आले होते. आता ईडीकडूनही त्यांची सखोल चौकशी करण्यात आली.

चौकशीनंतर माध्यमांशी संवाद साधताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, “ईडीने चौकशीसाठी बोलावले म्हणून मी आले. माझा अशोक खरात प्रकरणाशी कोणताही संबंध नव्हता आणि नाही.’

त्या पुढे म्हणाल्या, “ईडीने कोणते प्रश्न विचारले हे लवकरच अहवालातून समोर येईल. मी तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करणार आहे. अशोक खरातकडून तयार करण्यात आलेली खाती बनावट होती. समता पतसंस्थेशी माझ्या बहिणीचा कोणताही संबंध नाही.”

गुवाहाटी दौऱ्याबाबत स्पष्टीकरण देताना चाकणकर म्हणाल्या, “अशोक खरातचे कुटुंब आधी गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर आम्ही आमच्या कुटुंबासोबत दर्शनासाठी गेलो होतो. मी त्याच्यासोबत गेले नव्हते. अनेकांची त्याच्यावर श्रद्धा होती, आमचीही होती. मात्र नंतर त्याचे प्रकरण समोर आले.”

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज खरेदीला इच्छुकांच्या उड्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून प्रयत्न सुरू असतानाच उमेदवारी अर्ज खरेदीसाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. उमेदवारी अर्ज विक्रीच्या...