अहमदनगर | Ahmednagar
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील करोनाचा संसर्ग होणाऱ्या मंत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली आहे.
- Advertisement -
मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हंटले आहे की, “माझी करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी. लवकरच करोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे,”