Monday, May 5, 2025
Homeदेश विदेशPahalgam Terror Attack : रशियाकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध; पुतीन यांचा PM मोदींना...

Pahalgam Terror Attack : रशियाकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध; पुतीन यांचा PM मोदींना फोन, म्हणाले “जे कुणी सामील…”

नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था 

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानविरोधात (Pakistan) पाठिंबा मिळवायला सुरुवात केली आहे. कोणत्याही क्षणी भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होऊ शकते, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यातच आता जगात महासत्ता असलेला रशियाने भारताला संपूर्ण पाठिंबा जाहीर केल्याने भारताच्या लढ्याला आता मोठे बळ मिळाले आहे.

- Advertisement -

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) फोन करुन पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवला. नरेंद्र मोदींना पहलगामनंतर फोन करणारे रशियाचे पुतिन हे १८ वे जागतिक नेते आहेत. भारत आणि रशिया यांच्यात फार जुनी मैत्री आहे. अनेक प्रसंगात हे दोन्ही देश एकमेकांना मदत करण्यासाठी समोर आलेले आहेत. रशियाकडून (Russia) भारताला मोठी शस्त्रे मिळतात. युद्धजन्य परिस्थितीत रशियाने भारताला नेहमीच साथ दिली आहे.

https://twitter.com/ANI/status/1919323397617848415

व्लादिमिर पुतीन (Vladimir Putin) यांनी भारतातील दहशतवादी हल्ल्यामध्ये जे कुणी सामील असतील त्यांना कठोर शिक्षा मिळावी असे मत व्यक्त केले आहे. दहशतवाद आणि इतर अनेक गोष्टींवर भारत आणि रशिया एकत्र मिळून काम करतील असा विश्वासही पुतीन यांनी मोदींना दिला. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या ८९ व्या स्थापना दिवसाच्या पुतीन यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, या वर्षाच्या शेवटी भारतात (India) शिखर संमेलन पार पडणार असून त्यासाठी नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या पुतीन यांना आमंत्रण देखील दिले आहे.आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (International Court) रशिया-युक्रेन युद्ध्याच्या पार्श्वभूमीवर वॉरंट जारी केल्यानंतर पहिल्यांदाच पुतिन भारतात येणार आहेत. याआधी भारतात झालेल्या G20 परिषदेला पुतिन अनुपस्थित राहिले होते. त्यानंतर आता नरेंद्र मोदींनी स्वतःचं पुतिन यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले आहे.

रशियाने भारताला १९७१ साली दिला होता पाठिंबा

रशियाने भारताला १९७१ सालच्या युद्धात भारताला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा रशिया भारताच्या बाजूने उभा राहिल्याने हा पाकिस्तानला मोठा धक्का मानला जात आहे. पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताविरोधात पाकिस्तानने रशियाला मदतीसाठी आवाहन केले होते. मात्र, रशियाने पाकिस्तानचे आवाहन झुगारून लावत भारताला पाठिंबा दिला आहे.

 

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Unseasonal Rain : जिल्ह्यातील ‘या’ भागात गारांसह अवकाळी पावसाची हजेरी;...

0
नाशिक | Nashik राज्यातील अनेक शहरांमध्ये उन्हाचा तडाखा बसत असून, अवकाळीचे ढगही घोंघावत आहेत. आज (सोमवारी) जिल्ह्यातील मनमाड आणि पानेवाडी (Manmad and Panewadi Area) परिसरात...