Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेशरशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्ट; जमिनीवर कोसळताच...

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्ट; जमिनीवर कोसळताच…

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin Heart Attack) यांच्या प्रकृतीसंबंधी गेल्या अनेक महिन्यांपासून अंदाज वर्तवले जात आहेत. त्यातच आता पुतिन यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त समोर आले आहे. टेलीग्राम ग्रुप जनरल SVR ने यासंबंधी वृत्त दिले आहे. ते आपल्या खोलीमध्ये खाली कोसळलेले आढळले. यानंतर डॉक्टरांनी वेळीच त्यांच्यावर उपचार करुन त्यांचा जीव वाचवला, असे या चॅनलने सांगितले आहे.

- Advertisement -

जनरल SVR पोस्टने असा दावा केला आहे की “रविवारी रात्री मॉस्को वेळेनुसार अंदाजे २१:०५ वाजता, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना पुतिन यांच्या खोलीतून पडण्याचा आवाज ऐकू आला. दोन सुरक्षा अधिकारी ताबडतोब राष्ट्राध्यक्षांच्या खोलीत गेले तेव्हा ते जमिनीवर पडलेले दिसले.”

RSS Dasara Melava: दसरा मेळाव्यातील सरसंघचालक भागवतांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

जनरल SVR केलेल्या दाव्यानुसार, गेल्या काही दिवसांत झालेल्या विदेश भेटी आणि इतर कार्यक्रमांमध्ये पुतिन यांच्या जागी त्यांच्या बॉडी डबलने सहभाग घेतला आहे. पुतिन यांना त्यांच्या अधिकृत निवासस्थानी असलेल्या विशेष अतिदक्षता सुविधेत नेण्यापूर्वी डॉक्टरांना त्यांनी सीपीआर देत पुन्हा एकदा शुद्धीत आणावे लागले असा दावा यात कऱण्यात आला आहे.

जनरल SVR ने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले असून कोणताही पुरावा सादर केलेला नाही. आपल्या वृत्तात त्यांनी सांगितले आहे की, ” पुतिन यांच्या निवासस्थानी सुरक्षेत तैनात असणाऱ्या अधिकाऱ्यांनी राष्ट्राध्यक्षांच्या बेडरुममध्ये काहीतरी पडल्याचा आवाज आला. दोन सुरक्षा अधिकारी तात्काळ धावत गेले असता पुतिन खाली पडलेले होते. त्यांच्या शेजारी असणारे जेवणाचे टेबलही खाली पडलेले होते”. निवासस्थानी असणाऱ्या डॉक्टरांना तात्काळ रुममध्ये बोलावण्यात आले होते.

तर, WION या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. ही घटना रविवारी (२२ ऑक्टोबर) घडल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत माहिती समजतचाच त्वरीत डॉक्टरांना पाचारण करण्यात आले, आणि पुतीन यांना तातडीने त्यांच्या निवासस्थानी असलेल्या आयसीयू फॅसिलिटीमध्ये नेण्यात आले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या