Saturday, May 24, 2025
Homeदेश विदेशरशियाचे अध्यक्ष पुतिन आज भारत दौऱ्यावर, पंतप्रधान मोदींची घेणार भेट

रशियाचे अध्यक्ष पुतिन आज भारत दौऱ्यावर, पंतप्रधान मोदींची घेणार भेट

दिल्ली l Delhi

- Advertisement -

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) आजपासून भारताच्या दोन दिवसीय (Putin On India Tour) दौऱ्यावर आहेत.

२०१९ मध्ये ब्रासिलियामध्ये मोदी आणि पुतीन (Modi Putin Meet Today) यांची भेट झाली होती. त्यानंतर दोघांच्या भेटीची आणि चर्चेची ही पहिलीच वेळ आहे.

गेल्या सहा महिन्यात पुतिन पहिल्यांदाच एखाद्या देशाच्या दौऱ्यावर असणार आहेत. करोनाच्या संकटामुळे पुतिन यांचा भारत दौरा फारच कमी म्हणजे काही तासांचा ठेवण्यात आला आहे.

पुतिन दुपारी दिल्लीला पोहोचतील आणि ते फक्त ६-७ तास भारतात असतील. यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक पातळ्यांवर चर्चा होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या भारतात येण्याची वेळ जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र अंदाजानुसार रशियाचे राष्ट्राध्यक्ष दुपारी २ वाजता भारतात पोहोचतील आणि रात्री ९.३० वाजता त्यांच्या मायदेशी परततील.

प्रथम दोन्ही देशांच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांमध्ये टू प्लस टू चर्चा होईल आणि त्यानंतर संध्याकाळी ५.३० वाजता राष्ट्राध्यक्ष पुतिन दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत २१ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील.

‘या’ मुद्यांवर होणार चर्चा

भारतात ७.५ लाख एके-२३० असॉल्ट रायफल्सची निर्मिती

एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालीचे वेळेवर वितरण

१२ नवीन सुखोई-३० ची डिलिव्हरी

नौदलासाठी मिग-२९ विमानांची नवीन खेप

५००० इग्ला-एस शोल्डर फायर क्षेपणास्त्रांची खरेदी

भारत-चीन तणाव

अफगाणिस्तान

दहशतवाद आणि द्विपक्षीय व्यापाराचा मुद्दा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rahuri : राहुरी फॅक्टरी येथे आगीत तीन दुकाने जळून खाक

0
देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागातील किराणा दुकान, ब्युटी पार्लर व कपड्याचे दुकान ही तिन्ही दुकाने शॉर्टसर्किटमुळे लागल्या आगी भक्षस्यानी पडली. अचानक...