Tuesday, June 25, 2024
Homeमहाराष्ट्र'स्वच्छ मुख अभियाना’च्या ब्रँड ॲम्बेसेडरपदी सचिन तेंडुलकरची नियुक्ती; म्हणाला, माझ्या बाबांनी...

‘स्वच्छ मुख अभियाना’च्या ब्रँड ॲम्बेसेडरपदी सचिन तेंडुलकरची नियुक्ती; म्हणाला, माझ्या बाबांनी…

मुंबई | Mumbai

- Advertisement -

मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे ब्रँड ॲम्बेसेडर (Brand Ambassador) असणार आहेत. राज्य शासनाच्याकडून राबवल्या जाणाऱ्या या अभियानासाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी सचिन तेंडुलकर यांनी तयारी दाखवली आहे.

याबाबतचा सामंजस्य करार आज करण्यात आला. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सचिन तेंडुलकर हे या अभियानाचे ‘स्माइल ॲम्बेसेडर’ म्हणून पुढील पाच वर्षे कार्य करणार आहेत. यासंदर्भात आज झालेल्या कार्यक्रमात बोलताना सचिन तेंडुलकरनं गुटखा, तंबाखू अशा गोष्टींपासून लांब राहण्याचे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी सचिन तेंडुलकरनं त्याच्या वडिलांची एक आठवण सांगितली.

IPL 2023 Final : अंतिम सामना जिंकल्यानंतर महेंद्रसिंह धोनीची निवृत्तीबाबत मोठी घोषणा; पाहा व्हिडीओ…

मी जेव्हा भारतासाठी खेळायला लागलो, तेव्हा माझ्या बाबांनी (रमेश तेंडुलकर) माझ्याकडे एक वचन मागितले होते. तू कधीच तंबाखूचे प्रमोशन अथवा जाहिरात करणार नाहीस, असे मला वचन दे. ते वचन मी आजतागायत पाळले, असे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने (sachin tendulkar) सांगितले.

“तंबाखू वगैरेचा वापर काही लोक करत असतात. लहान मुलं-मुली त्यांना बघतात. त्यांनाही असं वाटतं की हे एवढं घेतायत, आपणही घेऊन बघू एकदा. तेही घेतात. त्यांना हे कळतच नाही की हळूहळू त्यांना या गोष्टीचे व्यसन लागते. त्याचा परिणाम थेट तोंडाच्या कर्करोगात होतो. पण या लोकांना हे समजत नाही की तोंडाच्या कर्करोगाने काय परिणाम होतात.

खासदार बाळू धानोरकर यांचे निधन; दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

याचा फक्त त्यांना त्रास होत नाही, त्याचा त्यांच्या आसपासच्या सर्वांनाच त्रास होतो. बऱ्याच कुटुंबांसमोर आर्थिक अडचण असते. त्यात आजाराचं ओझं सांभाळणं कठीण होऊन जाते. पण ही समस्या तुम्ही स्वत: ओढवून घेतलेली असते. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार असतातच. पण याला तुम्ही काहीही कारण देऊ शकत नाही”, असे सचिन यावेळी म्हणाला.

मी देशासाठी खेळायला लागल्यावर माझ्याकडे बऱ्याच ऑफर्स आल्या, (तंबाखूच्या) अनेक कंपन्यांनी मला भरपूर पैसे ऑफर केले, पण मी कधीच त्यांची ऑफर स्वीकारली नाही. माझ्या बॅटवर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कंपनीचा लोगो असायचा, पण दोन वर्ष बॅटवर कोणताही लोगो नव्हता.

कारण तेव्हा मला तंबाखू कंपन्यांनी ऑफर दिली होती, त्यांच्या स्टीकर बॅटवर लावण्यासाठी मला कोट्यवधी रुपये ऑफर करण्यात आले, पण मी ते कधीच स्वीकारले नाही. आज बाबा वरून पाहत असतील तर (‘स्माइल ॲंबॅसेडर’ म्हणून नियुक्ती झाल्यामुळे) आज खूप खुश असतील, अशा शब्दांत सचिनने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

- Advertisment -

ताज्या बातम्या