मुंबई | Mumbai
मुंबई येथील दादरमध्ये असलेल्या शिवाजी पार्क मैदानात “जाणता राजा” महानाट्याचे प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. या महानाट्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. दरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही (Master Blaster Sachin Tendulkar) शनिवारी छत्रपती शिवरायांच्या (Chhatrapati ) जीवनावरील या महानाट्याला भेट दिली.
शनिवारी या महानाट्याचा पाचवा प्रयोग असल्याने मोठी गर्दी होती, त्याचवेळी सचिनने या प्रयोगाला हजेरी लावली असता, छत्रपती शिवरायांना अभिवाद करण्यासाठी सचिन तेंडुलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
नामांतराच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगर मध्ये हिंदू संघटनांचा मोर्चा
याप्रसंगी बोलताना तेंडुलकर म्हणाले की, ‘माझ्या शाळेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या धड्याने झाली. त्यानंतर माझ्या क्रिकेटची सुरुवातदेखील छत्रपती शिवाजी महाराज मैदानातच झाली’.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
सोबतच, छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ‘जाणता राजा’ हे महानाट्य डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. या महानाट्याची अनुभूती घेतल्यानंतर “छत्रपती शिवाजी महाराज की जय” असे म्हटल्याशिवाय राहवत नाही, अशी भावना सचिनने व्यक्त केली. त्यांच्या या मनोगताने उपस्थितांची मने जिंकली.