Tuesday, May 21, 2024
Homeजळगावसचिन तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाची गोळी झाडून आत्महत्या

सचिन तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाची गोळी झाडून आत्महत्या

जामनेर – प्रतिनिधी –
शहरातील जळगाव रोडवरील गणपती नगर मध्ये वास्तव्यास असलेल्या प्रकाश गोविंदा कापडे वय 37 या पोलिसाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

प्रकाश कापडे हे CRPF मध्ये भरती झाले होते. त्यानंतर त्यांची पोस्टिंग होऊन ते मुंबई येथे सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचे अंगरक्षक म्हणून कर्तव्यावर होते. रात्री 1 वाजेच्या सुमारास प्रकाश कापडे यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे वृत्त शहरात पसरतात एकच खळबळ उडाली.

- Advertisement -

माहिती मिळताच जामनेर (jamner) पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा मृतदेह शवविच्छेदनसाठी जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या