Saturday, March 29, 2025
Homeमुख्य बातम्या'केतकीचा मला अभिमान'; सदाभाऊ खोतांकडून पोस्टचे समर्थन

‘केतकीचा मला अभिमान’; सदाभाऊ खोतांकडून पोस्टचे समर्थन

उस्मानाबाद | Osmanabad

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने आक्षेपार्ह पोस्ट केली. यानंतर तिला अटक (Arrested) करण्यात करण्यात आली…

- Advertisement -

या प्रकरणावर आता विविध स्थरातून प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केतकी चितळेच्या (Ketki Chitale) पोस्टचा निषेध नोंदवला आहे.

Visual Story : आसाममध्ये हाहाकार; अंगाचा थरकाप उडवणारे फोटो आले समोर

तर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कन्या खा. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एखादी व्यक्ती मरावी असे बोलणे माझ्या मध्यमवर्गीय संस्कारात बसत नाही, अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आता आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Visual Story : ११ वर्षानंतर शर्मिला टागोर बॉलिवूडमध्ये; ‘या’ चित्रपटात झळकणार

ते म्हणाले की, केतकी चितळे कणखर आहे. तिला कुणाच्याही समर्थनाची आवश्यकता नाही. केतकीला मानावे लागेल. न्यायालयात (Court) तिने स्वतःची बाजू स्वतःच मांडली. मला तिचा अभिमान आहे, असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळेचे कौतुक केले आहे.

केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी

तसेच अमृता फडणवीस (Amruta Fadnavis), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करताना तुमची नैतिकता कुठे गेली होती? असा सवाल त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) विचारला आहे.

सदाभाऊ खोत यांनी आज तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केतकी चितळेचे समर्थन केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर जवळील विजय ममता चित्रपटगृहाजवळ ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका तरुणाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक युवक...