Friday, September 25, 2026
HomeनगरRahata : गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताहास राजमान्यता द्या

Rahata : गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताहास राजमान्यता द्या

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राहाता तालुका |प्रतिनिधी| Rahata

लोकांच्या उत्स्फूर्त आणि विक्रमी सहभागामुळे सदगुरु गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह आता खर्‍या अर्थाने एक भव्य लोकोत्सव बनला आहे. त्यामुळे आषाढी-कार्तिकीच्या पंढरपूर वारीप्रमाणेच या ऐतिहासिक अखंड हरिनाम सप्ताहाला देखील राज्य सरकारने अधिकृत राजमान्यता प्रदान करावी, अशी जाहीर मागणी जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या 179 व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. भाऊसाहेब वाकचौरे, आ. रमेश बोरनारे, आ. विठ्ठलराव लंघे, आ. अमोल खताळ यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील अनेक प्रतिष्ठित मान्यवर आणि लाखो भाविक उपस्थित होते. सप्ताहाच्या माध्यमातून परस्परांमध्ये बंधुभाव वाढवणे, व्यसनमुक्त समाज निर्माण करणे आणि राष्ट्र बलशाली करण्याचा संकल्प करण्यात आल्याचे ना. विखे पाटील यांनी सांगितले. व्यासपीठावरून बोलताना ना. विखे पाटील म्हणाले की, महंत रामगिरी महाराज अत्यंत निष्ठेने अध्यात्माचा हा पवित्र वारसा पुढे नेण्याचे कार्य करत आहेत.

हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार हा देशातील संपूर्ण आध्यात्मिक चळवळीला मोठे पाठबळ देणारा आहे. हा सप्ताह आता द्विशताब्दीकडे वाटचाल करत असून, तो भारतातील आध्यात्मिक क्षेत्रातील एक अद्वितीय आणि ऐतिहासिक सोहळा ठरला आहे. जनशक्तीच्या आणि लाखो भाविकांच्या सहभागाने या सप्ताहाला लोकचळवळीचे व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. म्हणूनच, आषाढी-कार्तिकीच्या वारीच्या धर्तीवर या सप्ताहाला शासकीय पातळीवर सर्वतोपरी सोयी-सुविधा आणि अधिकृत राजमान्यता मिळायला हवी, असा आग्रही सूर मंत्री विखे-पाटील यांनी आपल्या भाषणात आवर्जून ओढला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे गणित गुंतागुंतीचे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील 21 जागांसाठी निवडणूक होणार असल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय गणिते पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. दरम्यान,...